घरमनोरंजनVideo: बॉलिवूडचे 'हे' सुपरहिट गाणे रिमेकनंतर झाले चांगलेच ट्रोल!

Video: बॉलिवूडचे ‘हे’ सुपरहिट गाणे रिमेकनंतर झाले चांगलेच ट्रोल!

Subscribe

मसकली २.० चे हे ट्रोल होणारं पहिलं रिमेक गाणं नाही तर यापुर्वीही अनेक गाणे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल झाले आहे

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसांबरोबर कलाकार मंडळी देखील घरीच आहेत. कोरोनामुळे चित्रपट, मालिका यांचे शुटिंग बंद असून ऑनलाईन रिलीजवर दिग्दर्शक मंडळींनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. चित्रपटगृह बंद असल्याने कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत नसला तरी मसकली २.० चे एक गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. २००९ साली प्रदर्शित झालेल्या दिल्ली ६ या चित्रपटातील मसकली या गाण्याचे ते रिमेक आहे.

या गाण्याला Youtube आणि Social Media वर चांगलीत पसंती मिळत आहे. मात्र, हे ऑरिजनल गाणं गाणारे गायक मोहित चौहान हे रिमेक गाणं ऐकून खूश नाहीत तर त्यांनी असे देखील सांगितले की, या रिमेक गाण्याचे संगीत ऑरिजनल गाण्यापेक्षा संपुर्ण वेगळे आहे, त्यामुळे या गाण्याला मसकली हे नाव देण्याची गरजच नव्हती.

- Advertisement -

मसकली २.० च्या रिमेक गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून नेटकरी या गाण्याला ट्विटरवर देखील ट्रोल करत आहेत. मसकली २.० चे हे ट्रोल होणारं पहिलं रिमेक गाणं नाही तर यापुर्वीही अनेक गाणे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहेत.

- Advertisement -

एक दो तीन

अभिनेत्री माधुरी दीक्षितचं गाजलेलं ‘एक दो तीन’ या गाण्याचे देखील रिमेक तयार करण्यात आलं तेव्हाही प्रेक्षक चांगलेच भडकले होते. या गाण्याच्या रिमेकमध्ये प्रेक्षकांना अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस बघायला मिळाली होती. यावेळी नेटकऱ्यांनी माधुरी दीक्षितच्या गाण्याची वाट लावली अशा प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर केल्या होत्या.

याद पिया की आने लगी

नेहा कक्कडने अनेक हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. याद पिया की आने लगी या रीमेक व्हर्जनलाही नेहाने आवाज दिला असून दिव्या कुमार खोसलाने या गाण्यावर परफॉर्म केले आहे. दिव्यानेही या गाण्याचे जोरदार प्रमोशन केले होते. त्यामुळे हे गाणे युट्यूबवर हिट ठरले, परंतु जुन्या गाण्याचे रिमिक्स केल्यामुळे सोशल मीडियावर हे गाणं देखील चांगलेच ट्रोल झाले.

मेरे अंगने में 2.0

बिग बॉसनंतर असिम रियाझने जॅकलिन फर्नांडिसबरोबर स्क्रीन शेअर केली होती. हे दोघंही ‘मेरे अंगने में’ मध्ये दिसली होती. गाण्यात असीमची भूमिका लहान होती, त्यामुळे त्याचे चाहते नाराज होते. मात्र त्यामुळे नेटकऱ्यांनी या गाण्याची टिंगल करत त्याला ट्रोल देखील केले होते.

दस बहाने

बागी ३ या चित्रपटाच्या दस बहाने या गाण्याला युट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळाला. या गाण्यात श्रद्धा आणि टायगरचा डान्स प्रेक्षकांना आवडला मात्र सोशल मीडिया नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधत रीमेक व्हर्जनवर टीका करत चांगलेच ट्रोल केले.

हे सगळेच गाणे सुपरहिट ठरले. मात्र हे गाणे फ्लॉप ठरले असे न म्हणता या सर्व गाण्यांना चांगल्या प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी दिल्या पण ट्रोल ही तेवढेच केले. आता मसकली २.० ही चांगलेच ट्रोल होत असलं तरी या रिमेकला युट्यूबवर आतापर्यंत २५ मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -