लंडनमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून आपल्या कुटुंबासमवेत राहणारा बॉलिवूड अभिनेता पूरब कोहलीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: पूरब कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या विषयी माहिती दिली. इंस्टाग्राम पोस्टच्या पूर्वी त्याने एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात सांगितले होते की, त्यांनी तब्येत खराब झाली होती मात्र आता सर्वजण बरे आहेत.
काय आहे त्या पोस्टमध्ये
पूरबने ही पोस्ट लिहीताना लिहीले आहे की, सुरूवातीला त्याच्या कुटुंबात सामान्य फ्ल्यूसारखीच लक्षणे दिसत होती. परंतु डॉक्टरकडे तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे असे सांगण्यात आले. पहिल्यांदा त्याची मुलगी इनायाची प्रकृती खालावली होती. दोन दिवस तिला थंडीचा त्रास होत होता. त्यानंतर, पत्नी लकी पायटेनच्या छातीत दुखायला लागलं. मला देखील कफचा त्रास होत होता. प्रत्येकजण कोरोनाबाबत कफच्या लक्षणांबद्दल बोलत होते. त्यादरम्यान, मला खूप सर्दी झाली. एके दिवशी तर मला खूप त्रास झाला. या काळात ताप जास्त नव्हता. आमच्या तिघांच्याही शरीराचे तापमान १०० ते १०१ फॅरनहाइटपर्यंत होते.’
एका कार्यक्रमात पुरब म्हणालेला…
“मित्रांनो, आम्हाला फ्लू झाला होता असं वाटत होतं. जेव्हा आम्ही ही लक्षणं जनरल फिजिशियनला दाखवली तेव्हा त्यांनी आम्हाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं. सुरुवातील अगदी सामान्य फ्लूसारखं वाटत होतं. परंतु त्यात खूप जास्त खोकला झाला आणि श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. ”
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला त्यांचा क्वारंटाइनचा काळ बुधवारी संपला. सध्या हा अभिनेता आणि त्याच्या कुटुंबीयाची तब्येत बरी आहे. पूरब कोहलीने रॉक ऑन, रॉक ऑन – 2, टाइपरायटर, आवारापन, शादी के साइड इफेक्ट्समध्ये काम केले आहे. याशिवाय शरारत, सारेगामापा, सिंगिंग सुपरस्टारमध्येही काम केले आहे.