घरताज्या घडामोडीCoronaVirus- पोलिसांचं कौतुक करताना सिद्धार्थकडून झाली चूक, म्हणाला...

CoronaVirus- पोलिसांचं कौतुक करताना सिद्धार्थकडून झाली चूक, म्हणाला…

Subscribe

भाजपच्या सोशल मीडिया व आयटी सेलचे सहनिमंत्रक पियुष कश्यप यांनी त्याला चांगलच सुनावलं आहे.

देशावर आलेलं करोनाचं संकट अत्यंत गंभीर असं होत चाललं आहे.  अशातच अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी बाहेर पडून सेवा आणि आपल कर्तव्य बजावत आहे. डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलिस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून देशाला संरक्षित ठेवत आहेत. रात्र असो किंवा दिवस.. २४ तास नागरिंकाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अभिनेचा सिद्धार्थ चांदेकर यांन देखील मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

 

पण यावेळी सिद्धार्थला एका यूजर्सने केलेल्या रिप्लायवर  ‘तू करोना पॉझिटिव्ह आहेस का’ असा प्रश्न विचारला. त्यावरून भाजपच्या सोशल मीडिया व आयटी सेलचे सहनिमंत्रक पियुष कश्यप यांनी त्याला सुनावलं आहे.

- Advertisement -

‘सिद्धार्थ चांदेकर या अभिनेत्याला संपूर्ण महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने डोक्यावर घेतलं. परंतु सिद्धार्थ चांदेकरला खरे आकडे सांगितले तर लगेच समोरच्याला करोना झाला का म्हणून हिणवणे कितपत योग्य आहे? अभिनेते स्वत:ला समजतात कोण? माणुसकी नावाचा प्रकार वगैरे असतो का यांच्यात?’, असा सवाल पियुष कश्यप यांनी केला. इतकंच नव्हे तर ‘माफी मागून ट्विट डिलीट केलं असतं तर त्याच्या समर्थकांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश गेला असता. पुन्हा फालतू ट्विट करू नकोस’, अशा शब्दांत त्यांनी सिद्धार्थला सुनावलं.

पियुष कश्यप यांच्या या ट्विटनंतर सिद्धार्थने दोघांचीही माफी मागितली. ‘आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. लवकरच यातून बाहेर येऊ,’ असं म्हणत सिद्धार्थने त्याची चूक मान्य केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -