Corona : अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण; पत्नी आणि मुलगाही पॉझिटिव्ह

अभिनेता सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबतची माहिती सुबोध यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सुबोध भावे सध्या गोरेगावमधील आपल्या घरी असून ते सुखरूप आहेत. डॉक्टरही त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असून आवश्यक सर्व औषधोपचार तो घेतो आहे. सुबोधच्या आधी त्याच्या पत्नीला मंजिरीला कोरोनाचं निदान झाले होते. सुबोध आपल्या कुटुंबासह गणपतीसाठी पुण्यात गेला होता. तिथून आल्यानंतर त्याच्या पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर सुबोधही कोरोना पॉझिटिव्ह निघाला असल्याचे समजते.

काय म्हटले आहे सुबोधचे ट्विटमध्ये

मी, मंजिरी (पत्नी) आणि मोठा मुलगा कान्हा यांना कोरोनाचे निदान झालं आहे. तिघांवरही कोरोनाचे उपचार सुरू असून आपण सुखरुप असून आपण सर्वांनी काळजी घ्या, असा मेसेज त्याने दिला आहे. सुबोध भावेने कोरोना काळात सातत्याने रंगमंच कामगारांना, कलाकारांना आणि गरजू रंगकर्मींना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली आहे. अनेक रंगमंच कामगारांना त्याने तात्पुरता रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. शिवाय, महाराष्ट्रात चित्रिकरण सुरू होण्यासाठीही पुढाकार घेणाऱ्या मोजक्या लोकांत सुबोध एक होता.

हेही वाचा –

Supreme Court : अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड