Amitabh Bachchan : बिग बींच्या घरात कोरोनाची एंट्री ; बंगल्यातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडचे बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावरील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा आणि जलसा या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रुटीन टेस्ट केली जाते.

Corona's entry into Amitabh Bachchan house; Corona positive, an employee at the bungalow
Amitabh Bachchan : बिग बींच्या घरात कोरोनाची एंट्री ; बंगल्यातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

देशभरात कोरोनाचे थैमान पुन्हा सुरु झाले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असून, बॉलीवूडसुद्धा कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहे. बॉलिवूडचे बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावरील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा आणि जलसा या बंगल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रुटीन टेस्ट केली जाते. यात सेक्युरिटी गार्ड,माळी आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यावेळेस 31 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील एका कर्मचाऱ्याला कोणतेही लक्षण नसताना कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

बंगल्यातील चाचणी केलेल्या 31 रुग्णांपैकी एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. त्यामुळे बीएमसीकडून संपूर्ण बंगल्याचे सॅनिटायझेशन आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या दोन बंगल्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा ‘माळी’चे काम करतो. मात्र बच्चन कुटुंबिय या कर्मचाऱ्याच्या संपर्कात न आल्यामुळे त्यांनी कोणतीही कोरोना चाचणी केली नाही.

गेल्या वर्षी 11 जुलैला बिग बींना कोरोनाची लागण झाली होती.ते जवळपास 1 महिना नानावटी रुग्णालयात उपचार घेत होते. अमिताभ बच्चन यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय बिग बींचा ‘द इंटर्न’ या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहेत.


हेही वाचा – corona Virus: प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन