Coronavirus : अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण

कोरोनाबाधित सेलिब्रिटींच्या यादीत नव्या नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवूडची अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण झाली आहे. तिने तिच्या कोविड रिपोर्टची माहिती सोशल मिडियावर दिली आहे. याशिवाय तिने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

Coronavirus: Actress Isha Gupta contracted coronavirus
Coronavirus : अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. या कोरोना विषाणूच्या विळख्यात आता हिंदीचित्रपटसृष्टीसुद्धा अडकत आहे. आता कोरोनाबाधित सेलिब्रिटींच्या यादीत नव्या नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवूडची अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण झाली आहे. तिने तिच्या कोविड रिपोर्टची माहिती सोशल मिडियावर दिली आहे. याशिवाय तिने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. ईशा गुप्ताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच लवकरच या कोरोना संक्रमणापासून मी बरी होईल अशी आशा तिने व्यक्त केली आहे. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

‘मी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेतली असून मला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मी कोरोनाच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. तुम्हालाही विनंती आहे की, सुरक्षित राहा,मास्क वापरा आणि कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे पालन करा’, अशा आशयाची पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

या अगोदरही अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये करीना कपूर, महीप कपूर, शनाया कपूर, अर्जुन बिजलानी, नकुल मेहता, जानकी पारेख, अर्जुन कपूर, सीमा खान, अमृता अरोरा, स्वरा भास्कर, प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. या पुन्हा एकदा वाढणाऱ्या महामारीमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच आता महामारीमुळे चित्रपटांच्या शूटिंग आणि रिलीजच्या तारखांवरही पुन्हा एकदा परिणाम होऊ लागला आहे.


हेही वाचा – Katrina -Vicky Kaushal Anniversary: विक्की कॅटच्या लग्नाला एक महिना पूर्ण, शेअर केला रोमँटिक फोटो