घरताज्या घडामोडीCoronavirus : अभिनेत्री जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह ; करण जोहरच्या सिनेमाचं शूटिंग...

Coronavirus : अभिनेत्री जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह ; करण जोहरच्या सिनेमाचं शूटिंग थांबलं

Subscribe

बिग बींच्या परिवाराला पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्य पत्नी जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, जया बच्चन यांचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहीती मिळाली आहे.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यातच कोरोनाचे नवे व्हेरिएंट पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. त्यातच सिनेसृष्टीतील कलाकारही या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान बिग बींच्या परिवाराला पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्य पत्नी जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, जया बच्चन यांचा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहीती मिळाली आहे. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर बिग बींच्या घरी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

करण जोहरच्या सिनेमाचं शूटिंग थांबलं

कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना बच्चन परिवारातील ऐश्वर्या, अमिताभ आणि त्यांची नात यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावेळेस जया बच्चन यांची कोरोनापासून सुटका झाली होती. मात्र तिसऱ्या लाटेत जया बच्चन यांनी कोरोनाने गाठले.दरम्यान करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या चित्रपटातील मुख्य भुमिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेत्री जया बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र दोघींनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे करण जोहरने चित्रपटाचं शूटिंग थांबवलं आहे.

- Advertisement -

एका वृत्तानुसार ,चित्रपटात काम करणारे कलाकार कोणताही धोक्याला सामोरे जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग थांबविण्याशिवाय करण जोहरकडे दूसरा पर्याय नव्हता.अभिनेत्री शबाना आझमी त्यानंतर जया बच्चन या दोघीही एकापाठोपाठएक थोड्या दिवसांच्या अंतराने कोरोना पॉझिटिव्ह आल्या.


हे ही वाचा – स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणं चुकीचं, अमृता फडणवीसांचा पलटवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -