Coronavirus : अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण

बॉलिवूडसृष्टीसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्वराने स्वत:ला आयसोलेट केले आहे. स्वरा भास्कर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट् करुन दिली आहे. 

CORONAVIRUS: Actress Swara Bhaskar contracted corona
CORONAVIRUS : अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता बॉलिवूडसृष्टीसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्वराने स्वत:ला आयसोलेट केले आहे. स्वरा भास्कर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट् करुन दिली आहे.  ‘कोविडची लक्षणे 5 जानेवारी 2022 पासून दिसू लागली. मी आणि माझे कुटुंब 5 जानेवारीच्या संध्याकाळपासून आयसोलेशनमध्ये आहोत याशिवाय मी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. मी एका आठवड्यापूर्वी ज्यांना भेटलो त्या सर्वांना मी माझ्या कोविड असण्याबद्दल माहिती दिली आहे. पण जर कोणी माझ्या संपर्कात आला असेल तर कृपया स्वतःची चाचणी करून घ्या,असे आवाहन स्वराने केले आहे.स्वरा भास्करचे ट्विट पाहून अनेक चाहते तिच्या लवकर बरे होण्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

‘हॅलो कोव्हिड, माझा आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. थोडा ताप आणि काही लक्षणे आढलल्यानंतर मी कोविड टेस्ट केली.मी दोन्ही लसींचे डोस घेऊनसुद्धा माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी आशा करते की,लवकरच सर्व गोष्टी सुरळीत होतील.तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.,अशा आशयाची पोस्ट तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर केली आहे.


हेही वाचा – Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबू कोरोना पॉझिटीव्ह