घरCORONA UPDATEअजय म्हणतो रोगप्रतिकारशक्ती वाढवणासाठी 'हे' घ्या औषध आणि झाला ट्रोल!

अजय म्हणतो रोगप्रतिकारशक्ती वाढवणासाठी ‘हे’ घ्या औषध आणि झाला ट्रोल!

Subscribe

अभिनेता अजय देवगण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. या कोरोनाच्या काळात तो नेहमी आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओद्वारे कनेक्ट असायचा. यावेळी त्याने कोरोनापासून वाचण्याचे अनेक उपाय सांगितले. मात्र यावेळी त्याने रोगप्रतिकारणशक्ती वाढवणाऱ्या एका औषधाची जाहिरात केली होती. यामुळे मात्र त्याला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं.

अजयने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, मित्रांनो, गेल्या महिन्याभरापासून मी IMMU 10T हे औषध घेत आहे. हे एएख प्रकारचे इम्युनिटी बूस्टर आहे. या औषधाने माझ्यावर खूप चांगला प्रभाव टाकला. तुम्ही हे औषध अ‍ॅमेझॉन इंडियावरुन खरेदी करु शकता.” अजयच्या या ट्विटनंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हे गंमतीशीर ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

- Advertisement -

अजय देवगण यांच्या ट्विटवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “सर, आयुर्वेद कंपन्यांनी रोग प्रतिकारशक्ती बूस्टरसाठी आपली किट आणले आहेत, तेव्हा तुम्ही परदेशी कंपन्यांनाचा प्रचार का करत आहात?”

- Advertisement -

अजय देवगण लवकरच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्मवरवर करण्यात येईल. अजय देवगण या आधी ‘तन्हाजी: द अनसंग वॉरियर’ मध्ये दिसला होता. वर्षाच्या सुरूवातीला तन्हाजीने २५० कोटींची कमाई केली.


हे ही वाचा – कोरोना अधिक गंभीर होतोय! आता थेट मेंदूवर हल्ला करतोय


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -