घरताज्या घडामोडीनाट्य व्यावसायिक संघात फूट, नव्या संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर!

नाट्य व्यावसायिक संघात फूट, नव्या संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर!

Subscribe

या कोरोनाच्या कठीण काळात मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघात फूट पडली आहे. मोठ्या निर्मात्यांचा संघटनेच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन वेगळी संघटना स्थापन करण्याची तयारी पूर्ण.  पुढच्या आठवड्यात नव्या संघटनेची घोषणा करण्यात येणार आहे.  नाट्यधर्मी निर्माता संघ असं  या नव्या संघटनेचे नाव आहे.  संघटनेच्या अध्यक्ष पदी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर असणार आहेत.

उपाध्यक्ष : महेश मांजरेकर

- Advertisement -

कार्यवाह : दिलीप जाधव

सहकार्यवाह : श्रीपाद पद्माकर

- Advertisement -

खजिनदार : चंद्रकांत लोकरे

प्रवक्ता : अनंत पणशीकर

कार्यकारी सदस्य : सुनील बर्वे, नंदू कदम

सन्माननीय सल्लागार : लता नार्वेकर, प्रशांत दामले

प्रशांत दामले, लता नार्वेकर, सुनील बर्वे यांच्यासह १० जणांनी यापूर्वीच आपले पूर्वीच्या संघटनेचे पद सोडली आहेत. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नाट्य निर्मात्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय या संघटनेने १९ मार्चच्या बैठकीत घेतला. ज्या २८ निर्मात्यांना आर्थिक मदत केली गेली त्यापैकी एकाही निर्मात्यांने गेल्या १० वर्षात एकही नाटक रंगभूमीवर आणलं नाही. या सरसकट मदतीवर संघटनेतील सदस्य असलेल्या अनेक निर्मात्यांनी आक्षेप घेतला आहे.


हे ही वाचा – ये बात! नेटफ्लिक्सवर ‘हे’ दहा चित्रपट होणार प्रदर्शित


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -