बिग बॉस २ च्या विजेत्यानं लॉकडाऊनमुळे घराच्या गच्चीवर उरकलं लग्न!

आशुतोष रोडिज सीझन ५ आणि बिग बॉस सीझन २ चा विजेता आहे.

बिग बॉस २ चा विनर आशुतोष कौशकने लॉकडाऊनमध्ये लग्न केलं आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये लग्न करताना त्याने लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नाही. लग्नात फार लवाजमा नव्हता. लग्न अगदी साध्या पद्धतीने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडले. पण आशुतोषने आपल्या लग्नासाठी निवडलेली जागा खूप भन्नाट होती. आशुतोष आपल्या घराच्या गच्चीवर आर्पिताबरोबर लग्न बंधनात अडकला. यावेळी केवळ ४ जणं उपस्थित होते. आशुतोषची आई आणि बहिण, अर्पिताचे आई भाऊ या लग्नाला उपस्थित होते.

Ashutosh Kaushik Page ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 27, 2020

आशुतोष रोडिज सीझन ५ आणि बिग बॉस सीझन २ चा विजेता आहे. आशुतोष आपल्या लग्नात वाचलेले पैसे पीएम फंडात दिले आहेत. मात्र नेमकी किती रक्कम त्याने पीएम फंडात दिली आहे हे आशुतोषने अद्याप सांगितलेलं नाहीये. आशतोषने आपल्या लग्नाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडिओत आशुतोष आणि अर्पिता टेरेसवर फेरे घेताना दिसत आहे. यावेळी दोघांनी मास्क आणि हातात ग्लोज घातलेले आहेत.

लग्न ही खूप खासगी गोष्ट आहे. तर त्यात उगाच गर्दी, गोंधळ, नाच गाण्याची काय गरज आहे. आपल्या खासगी गोष्ठींसाठी कोण ऐवढा खर्च करेल. माझं मत आहे लग्न हे आपल्या जवळ्यांदेखतच झालं पाहिजे अशी प्रतिक्रीया लग्नानंतर आशुतोषने दिली. पुढे बोलताना आशुतोष म्हाणाला, मी माझ्या लग्नातील वाचलेल्या खर्चाचे पैसे पीएम फंडात दिले आहेत. त्याचबरोबर मी एक युट्यूब चॅनल चालवतो. त्यातून मिळणारे पैसेही मी डोनेट केले आहेत.

बिग बॉस २चे विजेतेपद मिळवल्यानंतर आशुतोष बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्येही झळकला. किस्मत लव्ह पैसा दिल्ली, शॉर्टकट रोमीयो, आणि झीला गाझीयाबाद या चित्रपटांमध्ये आशुतोष झळकला.


हे ही वाचा – पोहण्याची हौस किती! दिवसाला ५ लाख भाडं भरून स्विमिंग पूलच घेतला भाड्याने!