घरट्रेंडिंगVideo - CoronaVirus Lockdown महेश मांजरेकरांनी तयार केली शॉर्टफिल्म!

Video – CoronaVirus Lockdown महेश मांजरेकरांनी तयार केली शॉर्टफिल्म!

Subscribe

तुमची एक छोटी चुक संपूर्ण कुटुंबाला कशी भोगावी लागेल हे या शॉर्टफिल्ममध्ये सांगतीलं आहे. ही फिल्म कोरोना व्हायरसवर आधारित आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे चित्रपट, मालिकांचे शुटींग थांबवण्यात आले आहे. पण घरात स्वस्थ बसतील ते कलाकार कसले. प्रत्येकजण घरातबसून काहीना काही उद्योग करत आहेत. कोणी व्यायाम कसा करावा याचे धडे देतय, तर कोणी स्वयंपाक घरात रमलय, नुकतीच बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी आपापल्या घरी राहून एक शॉर्ट फिल्म तयार केली. या शॉर्ट फिल्मचं खूप कौतुकही झालं. आता अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकरांनी देखील घरात बसून करोनावर आधारित शॉर्टफिल्म केली आहे. यामध्ये महेश मांजरेकरांच्या ३ मुली, बायको मेधा मांजरेकर दिसत आहे. या शॉर्टफिल्मचं सगळेच कौतुक करत आहेत.

- Advertisement -

तुमची एक छोटी चुक संपूर्ण कुटुंबाला कशी भोगावी लागेल हे या शॉर्टफिल्ममध्ये सांगतीलं आहे. ही फिल्म कोरोना व्हायरसवर आधारित आहे. यामध्ये कोणतेही संवाद नाहीत. पण तरीही या फिल्मचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. ही फिल्म बघताना तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. सध्या सर्वांनाच या कठीण काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तुमचा निष्काळजीपणा किंवा छोटीशी चूक सुद्धा खूप मोठ नुकसान करुन जाऊ शकते हे वास्तव आहे. असा संदेश या शॉर्टफिल्ममधून देण्यात आला आहे.

काय आहे फिल्ममध्ये

महेश मांजरेकरांच्या मुली लॉकडाउनमुळे घरात बसून कॅरम खेळताना तर महेश हे दारु पिताना आणि धूम्रपान करताना होते. दारु आणि सिगारेट संपल्यामुळे ते आणण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या मुली प्रयत्न करत असतात. पण ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि खाली जाऊन सिगरेट-दारु घेउन येतात. पण ते परत आल्यावर मात्र त्याचा परिणाम सर्व कुटुंबीयांवर होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -