Coronavirus : मलायका- करिश्मालाही कोरोनाचा धोका ; करण जौहरच्या पार्टीत ‘हे’ सेलिब्रिटी होते सहभागी

Coronavirus: Malaika-Karismalahi coronavirus threat; Who were the celebrities in Karan Johar's party?
Coronavirus : मलायका- करिश्मालाही कोरोनाचा धोका ; करण जौहरच्या पार्टीत 'हे' सेलिब्रिटी होते सहभागी ?

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री होत असून, बॉलीवूडही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे.दरम्यान, बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जौहरने आपल्या घरी पार्टी ठेवली होती.ज्यामध्ये सीमा खान,महीप कपूर,करीना कपूर,अमृता अरोरा,मलायका अरोरा,अर्जुन कपूर,करिश्मा कपूर सहभागी होते. याशिवाय अशी माहीती आहे की, आलिया भट्टसुद्धा या पार्टीमध्ये सहभागी होती अशी माहिती आहे.या पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी सर्वात पहिले सोहेल खानची पत्नी सीमा खान कोरोना पॉझिटिव्ह झाली. ८ डिसेंबरला करण जौहरच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती.ही पार्टी  ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ठेवण्यात आली होती.सीमा खानला हलके लक्षण आढळून आले होते.११ तारखेला त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

त्याचदिवशी, करीना कपूर आणि अमृता खानने आपले चेकअप करुन घेतले.त्यामुळे बीएमसीची टीम पार्टीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व बॉलीवूड सेलिब्रिटींना ट्रॅक करत आहे. त्यातच पार्टीमध्ये उपस्थित असणाऱ्या करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा यांच्या कोरोना रिपोर्टबाबत अद्यापही काही माहिती नाही.आता करीना,महीप कपूर आणि सीमा खानच्या नंतर मलायका अरोरा आणि करिश्मा कपूर यांच्या टेस्टचे काय झाले? या दोघींच्या कोरोना टेस्ट केव्हा होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

करिनाचे घर सील केले

सोमवारीच अभिनेत्री करिना कपूरने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली. करिनाने एक पोस्ट शेअर करत मी कोरोना पॉझिटिव्ह असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी. माझी तब्येत आता ठिक असून माझ्या कुटुंबातील व्यक्ती आणि स्टाफमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढलेली नाही, असे करिनाने म्हटले आहे. मुंबई पालिकेने करिनाचे घर सील केले असून करिनाच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे काम पालिका करत आहे.


हे ही वाचा – Defamation case: जावेद अख्तर यांनी वाढवल्या कंगनाच्या अडचणी, अजामीनपात्र वॉरंटसाठी कोर्टात विनंती