घरCORONA UPDATECoronavirus: टीका झाल्यानंतर आता शाहरूख खान करतोय भरघोस मदत!

Coronavirus: टीका झाल्यानंतर आता शाहरूख खान करतोय भरघोस मदत!

Subscribe

शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स, एण्टरटेनमेन्ट कंपनी रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट आणि रेड चिलीज वीएफएक्स आणि एनजीओ मीर फाउण्डेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे आता देशाच्या आर्थिक मदतीसाठी सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, रोहित शर्मा नंतर आता शाहरुख खानही मदतीसाठी पुढे सरसावला आहे. शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स, एटंरटेनमेंट कंपनी रेड चिलीज एटंरटेनमेंट आणि रेड चिलीज वीएफएक्स आणि एनजीओ मीर फाउण्डेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. खरंतर मागच्या आठवड्यात ट्विटरवर शाहरुखच्या विरोधात ट्रेंड झाला होता. मदत देत नसल्यामुळे त्यावर टीका देखील करण्यात आली होती.

शाहरुखने सोशल मीडियावरून मदतीबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर शाहरूखने लिहीले आहे की, जे तुमच्यासाठी न थकता काम करत आहेत, त्यांना कदाचित तुम्ही ओळखत नाहीत. पण तरीही त्यांना एकटं वाटू देऊ नका. आपण सगळे एक आहोत याची जाणीव त्यांना करून द्या. संपूर्ण देश आणि सर्व भारतीय एका कुटुंबाप्रमाणे आहेत.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात शाहरूखवर नेटकऱ्यांनी मदत न केल्यामुळे टिका केली होती. मात्र आता शाहरूखच्या या सोशल मीडियावरील पत्राने सगळ्यांची तोंड बंद झाली आहेत.

अशा प्रकारे शाहरूख करणार मदत

१ ) शाहरूख खान, गौरी खान, जुही चावला आणि जय मेहता यांचा आयपीएलमधील केकेआर संघ पंतप्रधान सहायता निधीमध्ये रक्कम दान करणार.

- Advertisement -

२) गौरी खान आणि शाहरूख खान यांची रेड चिलीज एंटरटेनमेंट महाराष्ट्र सीएम रिलीफ फंडाला रक्कम दान करणार.

३) मीर फाउंडेशन आणि एक साथ – द अर्थ फाऊंडेशन मिळून मुंबईतील ५ हजार ५०० कुटुंबाना एक महिन्यापर्यंत जेवण देणार. तसेच ज्यांना जेवण मिळत नाही अशा २००० जणांना दररोज जेवण पुरवणार.

४) मीर फाऊंडेशन आणि रोटी फाउंडेशन मिळून दररोज दहा हजार लोकांना एक महिन्यासाठी तीन लाख मील किट्स उपलब्ध करून देणार.

५) कोलकाता नाइट राइडर्स आणि मीर फाउंडेशन मिळून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना (हेल्थ वर्कर्स) ५०००० पीपीई किट उपलब्ध करून देणार.

६) वर्किंग पीपल्स चार्टर आणि मीर फाउंडेशनसोबत मिळून दिल्लीतील २५०० कामगारांना एक महिन्यापर्यंत उपयुक्त ग्रोसरी देणार.

७) यूपी, बिहार, बंगाल आणि उत्तराखंडमधील १०० एसिड अटॅक सर्वाइवर्सना मीर फाउंडेशनकडून मासिक भत्ता दिला जाणार.


हे ही वाचा –‘बॉलिवूड स्टार बजावताय महत्त्वाची भूमिका’; पंतप्रधनांनी केलं कौतुक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -