घरCORONA UPDATEलेखक चेतन भगत यांनी सांगितलं, 'या' दिवशी येणार कोरोनावर लस!

लेखक चेतन भगत यांनी सांगितलं, ‘या’ दिवशी येणार कोरोनावर लस!

Subscribe

जगातले सगळे लोक सध्या कोरोना विषाणूवर कधी एकदा लस मिळते याकडे डोळे लावून बसले आहेत. कारण जगभरात लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या भारतासह अमेरिका, ब्रिटन,जर्मनी, फ्रान्स, चीन असे अनेक देश लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता ही बहुप्रतिक्षित लस कधी येणार याचं उत्तर प्रसिध्द लेखक चेतन भगत यांनी दिलं आहे.

चेतन भगत यांनी पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोना लस सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचेल असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करत लस फेब्रुवारी महिन्यात येईल असं म्हटलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले चेतन भगत

जगभरातील शेअर मार्केट विशेषत: अमेरिकी शेअर मार्केटवर बघितल्यावर असं वाटतय की कोरोनावरील लस लवकरच येणार आहे. मला असं वाटतं की ऑक्टोबर २०२० पर्यंत सर्व ट्रायल पूर्ण होतील. त्यानंतर डिसेंबर २०२० पर्यंत सर्व प्रकारच्या संमती मिळतील आणि २०२१ फेब्रुवारी महिन्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत लस पोहचेल. अशा आशयाचं ट्विट चेतन भगत यांनी केलं आहे. त्यांच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

- Advertisement -

चेतन भगत यांच्या ट्विटला हजारोने लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांन हे ट्विट रिट्विट केले आहे. एवढच नाही तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांना त्यांच हे म्हणणं पटलं असच त्या कमेंट्स मधून दिसतय.


हे ही वाचा – आईला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -