घरताज्या घडामोडीCoronavirus : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीला कोरोनाची लागण

Coronavirus : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीला कोरोनाची लागण

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. यातून सिनेसृष्टीतील कालाकारांचीही सुटका झालेली नाही. नुकतंच बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. यातून सिनेसृष्टीतील कालाकारांचीही सुटका झालेली नाही. नुकतंच बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. शबाना यांनी त्यांच्या सोशल मिडियावर कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय चाहत्यांनी ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांच्या तब्ब्येतीबाबतही चिंता व्यक्त करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)

- Advertisement -

शबाना आझमी यांनी ही माहिती देताच, चाहत्यांनी जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांच्यापासून दूर रहा, अशा कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे.  शबाना आझमी यांनी चाहत्यांना पोस्ट शेअर करत सांगितले की, मला कोरोनाची सौम्य लक्षण असून, मी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यांच्या या पोस्टवर अभिनेत्री दिव्या दत्ता , दिग्दर्शक बोनी कपूर आणि मनिष मल्होत्रा यांच्यासोबत अनेक कलाकारांनी शबाना आझमी यांनी लवकर बरे व्हा, अशा कमेंट केल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या करण जौहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी’ या प्रेमकहाणीवर आधारित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जया बच्चन हेसुद्धा दिसणार आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – RRR: अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘आरआरआर’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -