घरमनोरंजनCovid 19 : कोरोना काळात कॉमेडियन अली असगर डॉक्टर्स, मेडिकल स्टाफचे पोटभर...

Covid 19 : कोरोना काळात कॉमेडियन अली असगर डॉक्टर्स, मेडिकल स्टाफचे पोटभर हसवून करतोय मनोरंजन

Subscribe

देशात कोरोना विषाणूने हैदोस घातला असून कोरोनाबाधित रुग्णांचा नातेवाईकांचे आपला रुग्ण वाचावा यासाठी धडपड सुरु आहे. यात डॉक्टर, सफाई कर्मचारी, नर्स, मेडिकल स्टाफचेही प्रत्येक रुग्णाचा जीव वाचण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दिवस- रात्र आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करत आहेत. त्यामुळे सतत १२-१२ तास शिफ्ट करुन या कर्मचाऱ्यांवरील ताणही अधिक वाढत आहे. याच दरम्यान अनेक सेवाभावी संस्था, सोशल वर्कर्स या कोरोनाबाधित रुग्णांचा मदतीसाठी धावून येत आहेत. यातच हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडियन अली असगरही या कोरोना योद्ध्यांचा मदतीसाठी धावून आला आहे.

कॉमेडियन अली असगर जमेल तितक्या रुग्णालयांना भेट देत तेथील डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टाफचे आपल्या विनोदी शैलीने काही वेळ का होईना मनोरंजन करत आहे. यावर बोलताना अली असगर सांगतो की, ”गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोना संकट काळात माझ्याने जमेल तितकी मदत करतोय. मी गोष्टी आजपर्यंत कोणाला कळू दिली नाही कारण मला वाट्टते, एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू द्यायची नाही. मला मुंबईतील सायन रुग्णालयातील यंग इंटर्न्स, डॉक्टर, नर्स आणि इतर हेल्थ वर्कर्सचे मनोरंजन करण्याची संधी मिळाली. येथील एका ऑडिटोरियमध्ये मी या कोरोना योद्ध्यांसाठी परफॉर्म्स केला. काही डॉक्टरांनी गाणी गायली तर या रुग्णालयातील डीन यांनी मोटिवेशनल स्पीच देत कोरोना महामारीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताणतणावाबद्दल माहिती दिली”.

- Advertisement -

अली याबद्दल पुढे सांगतो, ”डॉक्टर्स गेली अनेक महिने २४ तास सतत काम करुन थकून जात आहेत परंतु त्यांचावरील हा ताण कोणीही कमी करु शकत नाही. अनेकदा त्यांना घरी जाणेही जमत नाही अशावेळी त्यांना मनोबल वाढवणाऱ्या मानसिक आधाराची गरज असते. त्यामुळे या सर्वांचे मनोरंजन करत काही मिनिटे त्यांचा चेहऱ्यावर हास्य आणत आहे. त्यामुळे या कोरोना महामारीत माझ्याकडून काही चांगले करण्यासाठी हा माझा सहभाग होता यातून मी माझा देशासाठी काही तरी करु शकलो असे मला वाटते.” असेही अली सांगतो. तसेच ”लॉकडाऊनमध्ये ही दुसरी ईद आहे. असे वाटते की, जीवन जगणे कुठे तरी थांबले आहे. गेल्यावर्षी आशा होती की सर्वकाही सुरळीत होईल. यावेळी कोणालाच ठावूक नव्हते कोरोनाची दुसरी, तिसरी लाट येईल परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आज जगलो तर आजचा दिवस निघून गेला असे म्हणून उद्या पाहू की नाही माहिती नाही”, अशीही भावना अलीने व्यक्त केली.


रुके ना तू थके ना तू, झुके न तू म्हणत बिग बींनी दिल्या कोरोना योद्धांना अनोख्या शुभेच्छा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -