Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन इरफान खानच्या मुलाने केला 'पठाण'च्या गाण्यावर डान्स; शाहरुख म्हणाला...हा तुझ्यापेक्षा टॅलेंटेड

इरफान खानच्या मुलाने केला ‘पठाण’च्या गाण्यावर डान्स; शाहरुख म्हणाला…हा तुझ्यापेक्षा टॅलेंटेड

Subscribe

पठाण चित्रपटाची क्रेज आजही दिसून येतेय. 25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली. भारतात या चित्रपटाने करोडोंची कमाई केली. या चित्रपटातील गाण्यावर सोशल मीडियावर अनेकजण रिल्स तयार करताना दिसतात. दरम्यान, अशाप्रकारचा एक व्हिडीओ भारतीय क्रिकेट इरफान खानने शेअर केला आहे. ज्यात त्याचा लहान मुलगा पठाणच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

क्रिकेट इरफान खानच्या मुलाने केला पठाणच्या गाण्यावर डान्स

भारतीय क्रिकेट इरफान खानने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर मुलासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याचा लहान मुलगा पठाणमधील ‘झूमे जो पठाण’च्या गाणं एकताच हसत-हसत नाचताना दिसत आहे. इरफानने हा व्हिडीओ ट्वीटरला शेअर करत लिहिलंय की, “खानसाब कृपया तुमच्या यादीत आणखी एक क्यूट चाहता अॅड करा.” सोबतच इरफानने शाहरुख खानला टॅग केलं आहे. इरफान पठानच्या या व्हिडीओला रिट्विट करत शाहरुखने देखील उत्तर दिलं आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, “हा तुझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड निघाला… छोटा पठाण”.

- Advertisement -

दरम्यान, शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने जगभरात 1000 करोडपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर 500 करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

सलमानला आलेल्या धमकीच्या ईमेलचं यूकेशी कनेक्शन; मुंबई पोलिसांचा खुलासा

- Advertisment -