Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन क्रिकेटपटू श्रीसंतची मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये एंट्री,‘या’ सिनेमात करणार लीड रोल

क्रिकेटपटू श्रीसंतची मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये एंट्री,‘या’ सिनेमात करणार लीड रोल

खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिख ला जा’ ,'बिग बॉस'या रिअॅलिटी शोमध्ये श्रीसंत झळकला होता.

Related Story

- Advertisement -

भारतीय गोलंदाज श्रीसंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यास सज्ज होत आहे. एस श्रीसंत एका सिनेमात मुख्य भुमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीमुळे श्रीसंतच्या चाहत्यांना भरपूर आनंद होत. श्रीसंत सध्या बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्याच्या तयारीत आहे. ‘पट्टा’ नावाचा सिनेमामध्ये श्रीसंत महत्वाची भूमिका बजावणार असून त्याने चित्रपटाचं कॉन्ट्रॅक्ट देखिल साईन केलं आहे. या सिनेमामध्ये श्रीसंत सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल अशी सर्वांनाच आशा आहे. श्रीसंतने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र आयपीएलच्या लिलावात त्याला फारसं महत्व देण्यात आलं नाही. तसेच श्रीसंत पुन्हा आयपीएल कधी खेळणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sree Santh (@sreesanthnair36)

मॅच फिक्सिंगमुळे श्रीसंत चर्चेत
- Advertisement -

मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटर श्रीसंतचं नाव वादात आलं होतं. आयपीएल २००८ मध्ये राजस्थान रॉयलसाठी खेळताना स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्यामुळे श्रीसंतच्या खेळण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली होती. न्यायालयीन सुनावणीनंतर त्याला सोडण्यात आले. तसेच आनंदाची बाब म्हणजे ही बंदी गेल्यावर्षी उठवण्यात आली आहे. यादरम्यान, श्रीसंतने ‘अक्सर २’ आणि ‘टीम ५’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटात काम केल्यानंतर श्रीसंतने २०१४ मध्ये छोट्या पडद्यावरही एन्ट्री घेतली. ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिख ला जा’ ,’बिग बॉस’या रिअॅलिटी शोमध्ये श्रीसंत झळकला होता.


हे हि वाचा – BirthAnniversary: अभिनेत्री ते बॉलिवूडची ग्लॅमरस आई…रीमा लागू यांचा बॉलिवूडचा प्रवास

- Advertisement -