घरमनोरंजनभारतातील ‘रंगबाज’ जगभर दिसणार

भारतातील ‘रंगबाज’ जगभर दिसणार

Subscribe

गुन्हेगारी नाही असा देश सापडणे सध्यातरी कठीण. भारतामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे. एकंदरीत प्रांतवार विचार केला तर उत्तर प्रेदेशात गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात होत होती. पोलिसांनासुद्धा वेठीस धरण्याचे काम या ठिकाणी होत होते. नव्वदच्या दशकात स्थळ, काळ, वेळ सांगून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली होती. ज्या गँगची दहशत जास्त त्याचे वर्चस्व अधिक हे ठरलेले असायचे. झी-५ ही वाहिनी उत्तर प्रेदेशातील गुन्हेगारीवर आधारित ‘रंगबाज’ हा ऍक्शनपॅक शो २२ डिसेंबरपासून दाखवणे सुरू करणार आहे. सर्वांत मोठी, भयंकर, सत्य घटनेवर आधारित ही वेबसिरिज असणार आहे.

‘सिक्रेट गेम’ या मालिकेमुळे मनोरंजन विश्वात मोठा बदल झालेला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे म्हणजे सरकारी नियम, सेंसॉर बॉर्डाचे अधिकार यांचा विचार करून मालिका, चित्रपटाची निर्मिती करावी लागते. जी वस्तूस्थिती आहे, सत्य प्रकरण आहे याचा अभिनयातून, संवादातून, कृतीतून मागोवा घेता येत नव्हता. त्यामुळे कथा प्रभावी होत नव्हती. ‘सिक्रेट गेम’ने आपल्या कृतीतून ते दाखवले आणि अनेक वेबसिरिज, मालिका निर्माण झाल्या. ‘रंगबाज’ च्या नऊ भागांमध्ये जे काही पहायला मिळणार आहे ते सत्य घटनेशी निगडीत आहे. ‘गँग ऑफ वासेपूर’ या चित्रपटामध्ये जवळजवळ अशा कथानकाचा वापर केलेला आहे. ‘रंगबाज’ अशीच काहीशी असली तरी त्यातले रक्तरंजित प्रकरण खरेखुरे आहे.

- Advertisement -

जनमाणसात ‘गँग ऑफ वासेपूर’ला जी लोकप्रियता मिळाली ती लक्षात घेऊन झी-५ इंडियाचे सीईओ तरूण कटीयाल यांनी ही मालिका करण्याचे सुचवले. वर्षभरात प्रेक्षकांमध्ये आपले सातत्य टिकवण्यात झी-५ ला यश आलेले आहे. वर्ष सरते आहे, नव्या वर्षातही त्याचे सातत्य रहावे त्यादृष्टीने या मालिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ मिश्रा याने ही मालिका लिहिली असून भाव धुलिया याने त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. शिवप्रसाद शुक्ला याच्या जीवनावर ही मालिका आधारलेली आहे. साकीब सलीमने ही व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. यशिवाय अहाना कुमारा, तिग्मांशु धुलिया, रणवीर शौरी, रवीकिसन यांच्या यात भूमिका आहेत. भारतातील ही गुन्हेगारी यानिमित्ताने एकशे नव्वदहुन अधिक देशांत दिसणार आहे.

साकीब प्रेयसीचा हात पकडून मुंबईत आला 

- Advertisement -

साकीब सलीम हा तसा दिल्लीतला. मुंबईत वास्तव्य केल्याने स्वप्न साकार होते हे त्याच्या प्रेयसीने त्याला सांगितले आणि तो मुंबईत आला. अनेक ठिकाणी कामही केले, पण श्रीमंतीचे जीवन जगता येत नाही म्हणताना प्रेयसी निघून गेली. साकीब मात्र मुंबईतच थांबला. कोणाच्यातरी सांगण्यावरून चित्रपटात काम करण्याचे त्याला सुचवले गेले. अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण नसतानाही साकीबने पहिल्याच प्रयत्नात एक चित्रपट मिळवला आणि पुढे तो हवा हवाई, ढिशूंम, बॉम्बे टॉकिज या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकाही निभावल्या आणि आता स्वभावाच्या विरूद्ध ‘रंगबाज’ या वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिका तो करतो आहे. रोमॅन्टीक हिरो म्हणून माझी छबी असली तरी केव्हातरी अशा ऍक्शनबाज चित्रपटामध्ये गुंडांचा म्होरक्या होण्याची माझी इच्छा होती, ती या निमित्ताने पूर्ण झाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -