Cruise drug bust: ह्रतिक रोशनची आर्यनसाठी पोस्ट, म्हणाला …

आर्यनने लक्षात घेतले पाहिजे की, इतर गोष्टींमार्फत देखील आपण चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो

Cruise drug bust hrithik roshan share post for shahrukh khan's son aryan khan
Cruise drug bust: ऋतिक रोशनची आर्यनसाठी पोस्ट, म्हणाला ...

आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी शाहरुख (Shahrukh Khan)आणि आर्यनला पाठिंबा दिला. अभिनेता ह्रतिक रोशन (hrithik roshan ) याने आर्यनसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, ‘माय डीयर आर्यन. आयुष्य खूप विचित्र घटनांचा प्रवास आहे. आयुष्य महान आहे कारण तिथे जिथे कोणतीही गोष्ट निश्चित नाही. आयुष्यात आपल्या समोर अनेक आव्हाने समोर उभी राहतात. मात्र देव दयाळू आहे तो नेहमी कणखर लोकांसमोर आव्हाने उभी करतो. तुलाही माहितीय तुला यासाठी निवडले गेले आहे’,असे ह्रतिकने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ह्रतिकने पुढे असे लिहिले आहे की, ‘या सगळ्या अराजक परिस्थितीमध्ये तु स्वत:ला सांभाळ. मला हेही माहिती आहे की तु खूप ताणात आहेस. मला माहिती आहे की, तु आता हे अनुभवत असशील की, राग, कंन्फुजन,लाचारी आपल्या आतील हिरोला बाहेर काढण्यासाठी महत्त्वाचे आहे पण सावधान कारण या गोष्टी सगळं नष्ट करू शकतात.’

‘चुका, फेलियर, सक्सेस या सगळ्या गोष्टी एकसारख्या आहेत. आपल्या हातात कोणत्या गोष्टी ठेवायच्या आणि आपल्या अनुभवावरुन कोणत्या गोष्टी बाहेर टाकायच्या हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. आर्यनने लक्षात घेतले पाहिजे की, इतर गोष्टींमार्फत देखील आपण चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो’, असे ह्रतिकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘मी तुला एक मुलगा म्हणून ओळखतो. मी तुला एक पुरुष म्हणून ओळखतो. सगळ्या गोष्टी मिळवा ज्या गोष्टींचा अनुभव घेता येऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी मिळवा’, असे ह्रतिकने म्हटले.


हेही वाचा – Say No To Drugs : आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ३१ वर्षांपूर्वींच्या मोहिमेला संजीवनी