Cruise Drug Case: जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान काय म्हणाला आर्यन खान?

Cruise Drug Case I am a 23-year-Old With No Prior Antecedents said aryan khan tella court in bail hearing

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडे धाड टाकलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चर्चा (Cruise Drug Case) अधिकच रंगली आहे. कारण याप्रकरणात बॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा (shah rukh khan) मुलगा आर्यन खानचे (aryan khan) नाव समोर आलं आहे. त्यामुळे सध्या सर्वांचं याप्रकरणाकडे लक्ष आहे. तसेच बॉलिवूडमधील कलाकार देखील आता आर्यनच्या सुटेकसाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहून देवाकडे प्रार्थना करत आहेत. सध्या मुंबई कोर्टात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. यादरम्यान आर्यनच्या वतीने त्याचे वकील काय म्हणाले? ते पाहूयात (I am a 23-year-Old With No Prior Antecedents said aryan khan tella court in bail hearing)

आर्यनच्या वतीने त्याचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, ‘ड्रग्जचे प्रमाण कमी असलेल्या प्रकरणात हायकोर्ट देखील जामीन देते. पण माझ्याकडे तर काहीच मिळालं नाही आहे. साधं एक ग्रॅम ड्रग्जपण नाही. जामीन देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाकडेही आहे.’

पुढे आर्यनच्या बाजूने मानेशिंदे म्हणाले की, ‘मी २३ वर्षांचा एक मुलगा आहे, हे खरं आहे. माझ्यावर जुना कोणताही चुकीचा ट्रॅक रेकॉर्ड नाही आहे. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर होतो, तेव्हा मला एनसीबीने रोखले आणि माझ्याजवळ ड्रग्ज आहे का? विचारले. मी त्यांना नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांनी माझी, माझ्या बॅगची आणि माझ्या कपड्यांची तपासणी केली. त्यांनी माझा फोन घेतला, त्यांना वाटले की यातून काही चौकशीसाठी मिळले. परंतु गेल्या पाच दिवसांपासून काहीच समोर आलं नाही. मी एका चांगल्या कुटुंबातला मुलगा आहे, माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे.’

दरम्यान ज्याप्रमाणे आर्यनच्या बाजूने सतीश मानेशिंदे कोर्टात युक्तीवाद करत आहेत. त्याचप्रमाणे एनसीबीच्या बाजूने ASG अनिल सिंह मुद्दे मांडत आहेत. त्यांनी सुनावणी दरम्यान आता अरमान कोहलीच्या प्रकरणाचा उल्लेख केला. अनिल सिंह म्हणाले की, ‘याप्रकरणाच्या तपासात आर्यनची आवश्यकता आहे, अशा परिस्थिती जामीन दिला नाही पाहिजे.’ यावर सतीश मानेशिंदे म्हणाले की, ‘जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा आर्यन उपस्थितीत राहिलं.’


हेही वाचा – Samantha आणि Naga Chaitanyaच्या घटस्फोटामागे ‘या’ व्यक्तीचा हात