Cruise Drug Case: मला पार्टीत ग्लॅमर येण्यासाठी बोलावण्यात आले – मुनमून धमेचा

Cruise Drug Case what munmun dhamecha lawyer said during the bail hearing
Cruise Drug Case: मला पार्टीत ग्लॅमर येण्यासाठी बोलावण्यात आले - मुनमून धमेचा

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावरची आजची सुनावणी संपली आहे. आजची रात्रही या तिघांना आर्थररोड जेलमध्ये काढावी लागणार आहे. उद्या, गुरुवारी १२ वाजता आर्यनसह अरबाज, मुनमून यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. दरम्यान आज मुनमून धमेचाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यावेळेस मुनमून धमेचाचे वकील अली काशिफ काय म्हणाले? पाहा.

वकील अली काशिफ मुनमुनच्या बाजूने म्हणाले की, ‘माझ्याविरोधातली केस पूर्णपणे बनावी आहे. मला बलदेव नावाच्या इसमाने पार्टीसाठी बोलावले होते म्हणून मी गेले होते. त्याला अटक करण्यात आली नाही आणि मला अटक करण्यात आली. जर एका रुममध्ये ड्रग्स सापडले तर सगळ्यांची चौकशी व्हायला हवी होती, ती न होता मला अटक करण्यात आली. क्रूझवर १३०० लोकं होते. सोमिया नावाच्या मुलीकडे रोलिंग पेपर सापडला पण तिला जाऊ देण्यात आले. मला पार्टीत ग्लॅमर यावा म्हणून बोलावण्यात आले होते माझ्याकडे काहीही सापडले नाही.’

हेही वाचा – Who is Munmun Dhamecha: ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसोबत अटक झालेली मुनमुन आहे तरी कोण?

आर्यन आणि अरबाज मुनमूनला ओळखतही नाहीत. मात्र या दोघांसोबत तिलाही अटक करण्यात आली आणि ३ तारखेला कोर्टात हजर करण्यात आले. दोघांशी निगडित जो पंचनामा झाला त्यात मुनमूनचा संबंध नव्हता, असे आर्यन खानचे वकील अमित देसाई म्हणाले.


हेही वाचा – Cruise Drug Case: Aryan Khanला आजही मिळाला नाही जामीन; गुरुवारी होणार जामिनावर होणार सुनावणी