Who is Munmun Dhamecha: ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसोबत अटक झालेली मुनमुन आहे तरी कोण?

Cruise Drug Case what munmun dhamecha lawyer said during the bail hearing
Cruise Drug Case: मला पार्टीत ग्लॅमर येण्यासाठी बोलावण्यात आले - मुनमून धमेचा

रविवारी आर्यन खानसोबत (aryan khan) क्रूझमध्ये झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणात (cruise drug party case) अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) नावाच्या दोन जणांना एनसीबीने (NCB) अटक केली आहे. अरबाज आणि मुनमुन यांच्याकडून ड्रग्स जप्त केले गेले होते. काल आर्यनसह या दोघा जणांना एका दिवसाची कोठडी सुनावली होती. आर्यन खान शाहरुखचा (shahrukh khan) मुलगा आहे, हे सर्वांच माहित आहे, पण मुनमुन धमेचा कोण आहे? ते जाणून घेऊयात. (Who is Munmun Dhamecha)

 

View this post on Instagram

 

A post shared by Monarch Dhamecha (@munmundhamecha)

माहितीनुसार, मुनमुन धमेचा दिल्लीतील राहणारी आहे. खरंतर मुनमुन धमेचाचे घर मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात आहे. सध्या त्या घरात कोणीच राहत नाही आहे. गेल्यावर्षी मुनमुनच्या आईचे निधन झाले होते. माहितीनुसार, तिच्या वडिलांचा मृत्यू अगोदरच झाला आहे. मुनमुनला एक भाऊ आहे, ज्याचे नाव प्रिन्स धमेचा आहे. प्रिन्स दिल्लीत नोकरी करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monarch Dhamecha (@munmundhamecha)

मध्यप्रदेशाच्या सागरमध्येच मुनमुनने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर मुनमुन भोपाळमध्ये गेली आणि त्यानंतर जवळपास ६ वर्षापूर्वी ती भाऊ प्रिन्ससोबत दिल्लीला गेली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monarch Dhamecha (@munmundhamecha)

मुनमुनचे इन्स्टाग्राम पाहिले तर, ती एक मॉडेल असल्याचे समजते आहे. रँप वॉक करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय तिला पार्टीची आवड असल्याचे समजत आहे. मुनमुन धमेचाने अनेक पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. तिच्यासोबत काही बॉलिवूड स्टार्स असल्याचे पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Monarch Dhamecha (@munmundhamecha)


हेही वाचा – Aryan Khan Drug Case: संजूबाबा ते भाईजानला जामीन मिळवून देणारे वकील सतीश मानेशिंदे आहेत तरी कोण?