घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: ड्रग्ज संबंधित बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनने चॅट केल्याचा खुलासा

Cruise Drugs Case: ड्रग्ज संबंधित बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनने चॅट केल्याचा खुलासा

Subscribe

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसह इतर दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. १४ ऑक्टोबरला सेशन कोर्टाच्या दोन्ही बाजूच्या वकिलांची बाजू ऐकून झाल्यानंतर न्यायाधीश व्ही.व्ही पाटील यांनी जामीन अर्जांवर निर्णय राखून ठेवत २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या आर्यनला बेल की पुन्हा जेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. पण आर्यनच्या जामिनाच्या निकालापूर्वीच एक मोठा खुलासा झाला आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबतचे बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भात बातचित केली होती. कोर्टात युक्तीवाद सुरु असताना एनसीबीच्या टीमने आरोपीचे जे चॅट कोर्टात दाखल केले होते, त्यामध्ये आर्यनसोबत या अभिनेत्रीचे चॅट सामील होते. याशिवाय आर्यनचे काही ड्रग्ज पेडलरसोबतचे चॅट्स कोर्टात दाखल केले होते. मात्र अद्याप ही अभिनेत्री कोण आहे? याबाबत खुलासा झाला नाही आहे. पण या चॅटमुळे आज आर्यनच्या अडचणी वाढणार का? याकडे पाहणं महत्त्वाचं ठरले.

- Advertisement -

दरम्यान आर्यन खानच्या जामिनावर आज दुपारी २.४५ वाजता दुसऱ्या सत्रात निर्णय घेण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सुनावणीमध्ये एनसीबीचे बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह म्हणाले की, ‘सुरुवातीच्या तपासात आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले. सर्व एकमेकांना कनेक्टेड आहेत. त्यांना वेगवेगळे करून पाहिले जाऊ शकत नाही. आमच्या जवळ व्हॉट्सअॅप चॅट्स आणि इतर पुरावे आहेत.’ त्यामुळे आर्यनला जामीन न देण्याची मागणी एनसीबीने केली होती.


हेही वाचा – Aryan Khan drugs case: आर्यन खानच्या बेलसाठी राम कदम यांचं देवाकडे साकडं

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -