Cruise Drugs Case: मुलाच्या काळजीने शाहरुख अस्वस्थ; अन्नही गोड लागेना

Aryan Khan mumbai drugs case bollywood actor shahrukh khan reach arthuhr road jail to meet aryan khan
aryan Khan : आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात

बॉलिवूडच्या किंग खानचा मुलगा आर्यन खानची क्रूझ ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरू आहे. याप्रकरणामुळे आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून अजूनपर्यंत त्याला जामीन मिळाला नाही आहे. एनसीबीच्या या तपासादरम्यान आर्यनच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आले नाही आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार शाहरुख खानबाबत अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. नुकत्याच आलेल्या माध्यमांच्या वृत्तानुसार, आर्यनमुळे शाहरुख खान खूप अस्वस्थ आहे. अशा परिस्थितीत शाहरुख ना धड जेवतोय, ना धड झोपत आहे.

सध्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची सातत्याने चौकशी केली जात आहे. यादरम्यानच याप्रकरणातील नवे अपडेट्स समोर येत आहेत. कोईमोईच्या एका रिपोर्टनुसार शाहरुखच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, तो बाहेरुन खूप शांत आहे. परंतु आपले दुःख आणि राग दाखवत नसून आतल्या आत त्याचा संघर्ष सुरू आहे. ना तो धड जेवतोय आणि ना झोपतोय. तो नेहमी काही तासांसाठीच झोपत होता. पण आता ती झोप देखील उडाली आहे.

कोईमोईच्या रिपोर्टमध्ये एका फिल्ममेकरच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला आहे. माहितीनुसार, त्याने सांगितले की, काय होता किंग? शेवटी तो एक तुटलेला आणि असहाय्य वडील आहे. दरम्यान आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख आपल्या मुलासोबत फक्त दोन मिनिटांसाठी बोलू शकला होता. तेव्हा शाहरुख एनसीबीची परवानगी घेऊन मुलाला भेटला होता.


हेही वाचा – Cruise Drugs Case: आरोपी परदेशात पुरवणार होते ड्रग्ज, हॉलिवूड कलाकारांच्या चॅटमधून खुलासा