Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'या' हॉटेलमध्ये वेटर्सकडून ग्राहकांचा होतोय अपमान; पण तरीही इथे जाण्यासाठी ग्राहक असतात...

‘या’ हॉटेलमध्ये वेटर्सकडून ग्राहकांचा होतोय अपमान; पण तरीही इथे जाण्यासाठी ग्राहक असतात उत्सुक

Subscribe

'करन्स डिनर' नावाच्या या हॉटेलमध्ये अनेक जण इथल्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जातात. परंतु तिथे गेल्यावर इथल्या वेटर्स कडून ग्राहकांचा अपमान केला जातो. ग्राहकांना इथे अश्लील चेष्टा सुद्धा सहन करावी लागते.

जगभरात असे अनेक विचित्र हॉटेल्स आहेत, जिथे गेल्यावर लोक आश्चर्यचकित होतात. ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील एका हॉटेलच्या सेवेवर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. परंतु प्रत्यक्षात मात्र तिथे गेल्यावर तिथले स्वादिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर लोकांचा विचार बदलत आहे. खरं तर या हॉटेलमधील वेटर ग्राहकांशी उद्धटपणे वागतात. ग्राहक ऑर्डर देतात तेव्हा इथे काम करणारे वेटर्स ग्राहकांचा अपमान करतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे वेटर असं का करतात? ग्राहकांचा अपमान करूनही वेटर्सचं कौतुक का केलं जात असेल?

अपमानास्पद वागणूक मिळूनही ग्राहक या हॉटेलमध्ये जाण्यासाठी तयार

- Advertisement -

‘करन्स डिनर’ नावाच्या या हॉटेलमध्ये अनेक जण इथल्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. परंतु तिथे गेल्यावर इथल्या वेटर्सकडून ग्राहकांचा अपमान केला जातो. ग्राहकांना इथे अश्लील चेष्टासुद्धा ऐकावी लागते. इतकंच नव्हे तर, अशा पद्धतीची चेष्टा करूनही ग्राहक वेटर्सला टिप देऊन निघून जातात. खरं तर या हॉटेलचे ग्रेट फूड, टेरिबल सर्व्हिस हे ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच स्वादिष्ट पदार्थांसोबत विचित्र सेवाही दिली जाते. जेव्हा वेटर ग्राहकांशी विचित्र वागतो, तेव्हा ग्राहकही हसून विनोद करतात.

ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्येही असे हॉटेल्स

- Advertisement -

सध्या ऑस्ट्रेलियाशिवाय ब्रिटनमध्येसुद्धा करन्स डिनर नावाचे हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या वैशिष्ट्यामुळे लोक इथे येण्यासाठी पसंती देतात आणि इथले स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात. खरं तर या हॉटेलचे नाव अमेरिकन स्लॅंगच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ‘कधीही समाधानी न होणारा व्यक्ती’ असा आहे. या हॉटेलची शाखा प्रथम सिडनी, ऑस्ट्रेलिया, त्यानंतर ब्रिस्बेन येथे उघडण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आता इतर शहरांमध्ये देखील या हॉटेलची शाखा चालू होण्याची शक्यता आहे.

एका ग्राहकाने शेअर केला ‘या’ हॉटेलचा अनुभव

एका ग्राहकाने या हॉटेलचा अनुभव शेअर केला, तेव्हा त्याने सांगितले की, ज्यावेळी तो आपल्या मुलीसह या हॉटेलमध्ये गेला, तेव्हा तिथल्या वेटरने त्याच्या मुलीच्या केसांची मस्करी केली. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. परंतु हॉटेलचा मालक म्हणाला की ‘मला माझ्या हॉटेलमध्ये असे वातावरण तयार करायचे आहे, जिथे लोकांना काहीही बोलण्यास मोकळीक असेल’.


हेही वाचा :Video : बच्चन पांडेनंतर अक्षय कुमार आणतोय प्रेक्षकांसाठी नवा सेल्फी, पाहा धम्माल व्हिडीओ

- Advertisment -