घरमनोरंजनDadasaheb Phalke Award 2021: रजनीकांत यांच्यावर राजकीय नेत्यांसह बॉलिवडमधूनही शुभेच्छांचा वर्षाव

Dadasaheb Phalke Award 2021: रजनीकांत यांच्यावर राजकीय नेत्यांसह बॉलिवडमधूनही शुभेच्छांचा वर्षाव

Subscribe

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना यंदाचा सर्वोच्च असा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2021′ जाहीर करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात आज घोषणा केली. यानंतर पंतप्रधान मोदींसह देशभरातून अनेक चाहते, राजकारणी, तसेच बॉलिवूड कलाकारांनीही रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनीही या पुरस्कार प्राप्तीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रजनीकांत यांनी शुभेच्छा देत ट्वीट केले की, पिढ्यांपिढ्या लोकप्रिय, वेगवेगळ्या भूमिका, एक प्रेमळ व्यक्तिमत्व…श्री रजनीकांत तुमच्यासाठी..थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन,’ पंतप्रधान मोदींचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

भारताचे राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी देखील रजनीकांत यांचे कौतुक करत भावा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

या सुपरस्टार रजनीकांत यांनीही आनंद व्यक्त करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानत त्यांनी सिनेसृष्टीतील प्रवासात लाभलेल्या अनेकांचे आभार मानले.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पुरस्काराची घोषणा करत ट्विटवरून रजनीकांत यांचे कौतुक केले.

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही रजनीकांत यांना शुभेच्छा देत चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल कौतुक केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रजनीकांत यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचे कौतुक करत अभिनंदन केले.

त्याचप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडुरप्पा यांनीही रजनीकांत यांचे कौतुक केले आहे.

त्याचप्रमाणे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता महेश बाबूनेही रजनीकांत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनाही ट्विट करत रजनीकांत यांचे कौतुक केले.

याचबरोबर जगभरातील रजनीकांत यांचा चाहता वर्ग सोशल मीडियाच्या माध्यामातून कौतुक करत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -