घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Subscribe

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. यापूर्वी देखील त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती नुकतीच प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर दिली आहे. अनुराग यांनी ट्वीट करत लिहिले की, “भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल वहिदा रहमान जी यांना यावर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटत आहे.” वहिदा रहमान यांना हा पुरस्कार जाहिर होताच त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार आनंद व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा : कंगना रनौत 2024 मध्ये करणार लग्न?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -