घरमनोरंजनDada Saheb Phalke Award 2021: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला दादासाहेब फाळके पुरस्कार...

Dada Saheb Phalke Award 2021: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला अनेक महिने उलटले. पण सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी चाहत्यांची लढाई अद्याप सुरु आहे. अनेक चाहते आजही सुशांतच्या आठवणींना उजाळा देत असतात. याचदरम्यान सुशांत सिंग राजपूतला कलाविश्वातील एक मोठ्या बहुचर्चित अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. कलाविश्वातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्डने सुशांतचा सन्मान करण्यात आला. नुकताच मुंबईत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘दिल बेचारा’ या शेवटच्या चित्रपटासाठी सुशांतला हा अवॉर्ड देण्यात आला आहे. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनेता म्हणून सुशांतचा सन्मान करण्यात आला.

दादा फाळके म्हणजेच DPIFF या सोशल मिडिया अकाउंडवरुन ही माहिती देण्यात आली आहे. DPIFF ने इंस्टाग्राम अकाउंटवर सुशांतसिंह राजपूतचा एक फोटो शेअर कर ‘क्रिटिक्स बेस्ट एक्टर…. दिवगंत श्री सुशांतसिंह राजपूत (1986-2020) असे कॅप्शन देण्यात आले आहे. सुशांतने ‘काई पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. या चित्रपटानंतर सुशांतने अनेक चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडमधील स्थान पक्के केले. याच्या बॉलिवूड करियरमधील एमएस धोनी, छिछोरे, शुद्ध देसी रोमांस असे सुपरहिट चित्रपट दिले. यातील ‘दिल बेचारा’ हा चित्रपट त्याच्या करियरमधील शेवटचा सिनेमा ठरला. ३४ वर्षीय सुशांतने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात होती. पंरतु त्याचा मृत्यूचा तपास अद्याप पोलीस, सीबीआय, ईडी, एनसीबी करत आहे.


हेही वाचा- Video: प्रियंका चोप्रानं निकला दिलं अनोखं सरप्राईज; म्हणाला…
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -