श्रिया पिळगांवकर, भुवन बमसोबत दिसणार ‘दगडू’, प्रथमेश परबची ओटीटीवर एन्ट्री

ताजा खबर या हिंदी वेब सीरिजमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

prathmesh parab

टाईमपास चित्रपटातून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका ‘दगडू’ प्रथमेश परब (Marathi Actor Prathmesh Parab) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ताजा खबर या हिंदी वेब सीरिजमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (‘Dagadu’ to be seen with Shriya Pilgaonkar, Bhuvan Bus, Parab’s debut on OTT platform)

प्रसिद्ध युट्यूबर भूवन बम आणि अभिनेत्री श्रिया पिळगांवकर यांच्यासोबत प्रथमेश स्क्रीन शेअर करणार आहे. नुकताच, या वेब सीरिजचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. तसेच, प्रथमेशबरोबरच आणखी काही मराठी कलाकार या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. डिजनी हॉटस्टार प्लसवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.

टाईमपास चित्रपटामध्ये दिसलेल्या प्रथमेश परबने पुढे अनेक चित्रपट यशस्वी केले. व्यवसायिक नाटकाबरोबर प्रायोगिक नाटकातही तो दिसला. मधल्या काळामध्ये त्याची चर्चा थांबली होती. पण आता तो पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. त्याने आतापर्यंत अनेक यशस्वी चित्रपट दिले असल्याने त्याच्या या नव्या कोऱ्या वेब सीरिजसाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत.