दंगल टीव्ही ‘दंगल नया साल धमाल’ कार्यक्रमातून नवीन वर्षाचे करणार जल्लोषात स्वागत

२२ डिसेंबर, २०२२, मुंबई: सुट्टीचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे आणि तुम्ही तुमचे सेलिब्रेशन प्लान करणारच असाल, तेव्हा भारताची आघाडीची जीईसी दंगल टीव्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे मनोरंजन, मजा-मस्ती, नाच-गाणी आणि धम्माल नाट्य असलेली रात्र. पार्ले २०-२० कुकीज आयोजित ‘दंगल नया साल धमाल’ शो २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दंगल टीव्हीवर प्रसारित होणार आहे. तेव्हा तुमच्या फेस्टीव्ह प्लानमध्ये अनलिमिटेड मनोरंजनाची ही वेळ राखून ठेवा.

तुमच्या आवडत्या टीव्ही अभिनेत्यांचे शानदार सादरीकरण या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. जलेबी भाऊजी म्हणजेच अली असगर आणि हर्ष लिंबाचिया या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. या दोघांच्या शहरी आणि ग्रामीण तडक्याच्या आयकॉनिक मिक्समुळे अँकरिंगला वेगळीच चव येणार आहे. हे दोघेही शहरी आणि ग्रामीण पार्टी प्लानर्स म्हणून दिसणार आहेत आणि दोघेही एकमेकांच्या व्यवसायासाठी आतुर असतील.

त्यांचा विनोद आणि एकाहून एक सुंदर सादरीकरणामुळे ही एक धमाल रात्र होणार आहे. तेव्हा सज्ज व्हा, भन्नाट सादरीकरणांसाठी. हे परफार्मन्सेस सादर करतील सिंदूर की किमत मधील वैभवी हनकारे (मिश्री), बिंदिया सरकारमधील सोनल खिलवानी (बिंदिया), जनम जनम का साथ मधील निक्की शर्मा (विधी), इश्क की दास्ताँ-नागमणी मधील आलिया घोष (पारो), आदित्य रेडिज (शंकर) आणि आणखीही खूप जण.

तुमची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी फावरा चौकमधली मोना लिसा (रमा) बेली डान्स सादर करणार आहे. इश्क की दास्ताँ मधील इम्रान (दुर्जन सिंह) आणि सिकंदर खरबंदा (हरिशंकर) हे दोघे बिंदिया सरकारमधील नीलू (बर्फी देवी) हिच्यासह ‘ठुमकेश्वरी’ हा क्लासिक अॅक्ट करणार आहेत आणि या मजेशीर अॅक्टमध्ये भर घालणार आहेत सौदा खरा खरा चा संपूर्ण दंगल परिवार.

‘वर्षोन् वर्षे आम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत एक खूप घट्ट नाते निर्माण केले आहे आणि प्रेक्षकांसोबत सर्व महत्त्वाचे सण-उत्सव आम्ही सातत्याने साजरे करत आलो आहोत. यंदाचे नवे वर्ष खास बनवण्यासाठी आम्ही दंगल टीव्हीवरील सर्व शोजमधील तुमची आवडती पात्रे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामुळे ही रात्र धम्माल मनोरंजनाची होणार आहे आणि यानिमित्ताने आम्ही प्रेक्षकांसोबत भरपूर मनोरंजनाने भरलेली न्यू इयर पार्टी साजरी करत आहोत,’असे एन्टरर१० टीव्ही नेटवर्क प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मनीष सिंघल म्हणाले.