सईची ताम्हणकरची वेबसीरिज ‘डेट विथ सई’

‘डेट विथ सई’ ही थराररक वेब सिरीज असून ती पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. 

सई ताम्हणकरचं वेब सिरीजच्या विश्वात पदार्पण (फाईल फोटो)

मराठीतील हॉट अँड बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर आता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सई ताम्हणकरची पहिली वहिली वेबसिरीज डेट विथ सई लवकरच रिलीज होणार आहे. सध्याच्या घडीला मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री असलेली सई ताम्हणकर या निमित्ताने वेब सिरीजच्या विश्वात प्रवेश करते आहे.  डिसेंबरपासून सुरू होणा-या या वेबसीरिजविषयी सध्या खूप उत्कंठा आहे. या वेबसीरिजशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक थरार मालिका असणार आहे. यामध्ये सई स्वत:च्याच अर्थात सई ताम्हणकरच्याच भूमिकेत असेल. सई ही पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे, जी एखाद्या वेबसीरिजमध्ये स्वत:च्याच भूमिका साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या वेबसीरजमध्ये सईचा वेडसर फॅन तिचा पाठलाग करत असतो. जो सईच्या नकळत तिचे आपल्या मोबाइलच्या कॅमे-यात चित्रीकरण करत असतो. यानंतर घडणाऱ्या अनेक घडामोडींचा थरारक प्रवास म्हणजे  डेट विथ सई ही वेबसिरीज. दरम्यान, ही वेबसीरिज पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल असा दावा निर्मात्यांनी केला आहे.


धक्कादायक : दीपिका-रणवीरचं लग्न आलं अडचणीत

पहिलाच अनुभव वेगळा

डेट विथ सई’ विषयी बोलताना सई ताम्हणकर म्हणाली, “डेट विथ सई सारखा थरारशैलीचा चित्रपट वा मालिका मी कधीच केली नव्हती. त्यामुळे ही वेबसीरिज माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. एका फॅनचं तुमच्यावरच असलेलं प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. ‘डेट विथ सई’च्या निमित्ताने मी वेबसीरिजच्या विश्वात पाऊल ठेवत आहे. डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या या वेबसीरिजची मी खूप उत्सुकतेने वाट पाहत आहे.”

‘डेथ विथ सई’ वेबसिरीजचं पोस्टर