dawood girlfriend mehwish hayat : ‘सूर्यवंशी’ वर दाऊदची ‘गर्लफ्रेंड’ भडकली, अन् म्हणाली…

Dawood girlfriend mehwish hayat got angry on 'Suryavanshi', And said ...
dawood girlfriend mehwish hayat : 'सूर्यवंशी' वर दाऊदची 'गर्लफ्रेंड' भडकली, अन् म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा सूर्यवंशी सिनेमा ५ नोव्हेंबरला रिलीज झाला.नुकताच प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस आला असून, प्रदर्शनापासूनचं हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कल्ला करतोय.मात्र या सिनेमाच्या आशयाला अनेक लोक टार्गेट करत असून, सोशल मिडियावर ट्रोलिंगला सुरवात झाली आहे. या सुर्यवंशी चित्रपटावर आता पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने ट्विट करत शाब्दिक हल्ला केला आहे. हा सिनेमा इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप तिने केला आहे. मेहविश हयात ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड असल्याचा दावा सोशल मिडियावर करण्यात येत आहे.

मेहविशने बुधवारी ट्विटरवर लिहिले की, अलीकडचा बॉलिवूड चित्रपट ‘सूर्यवंशी’ इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देणारा सिनेमा आहे. हॉलीवूडमध्ये काळानुसार गोष्टी बदलत आहेत आणि मला आशा आहे की सीमेपलीकडील लोक त्याचे अनुसरण करतील. जर तुम्हाला एखादी गोष्ट स्पष्ट मांडता येत नसेल तर, किमान मुस्लिमांचे चित्रण ज्या पद्धतीने केले जाते त्याबद्दल व्देष न बाळगता,बंधुभाव जपत नि:पक्ष राहून सिनेमातील आशयही तितकाच स्पष्ट मांडा.

कोण आहे मेहविश हयात ?

मेहविश हयात ही पाकिस्तानी गर्लफ्रेंड असून, ती नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. लोड वेडिंग, पंजाब नही जाउंगी आणि अॅक्टर-इन-लॉ या चित्रपटांमुळे मेहविशला प्रिसिद्धी मिळाली.यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दाऊदचे पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातसोबत रिलेशनशिप असल्याचा दावा करण्यात आला होता.  दाऊदपेक्षा मेहविश ही २७ वर्षांनी लहान आहे. मेहविशला ‘तमगा-ए-इम्तियाज’ हा नागरी सन्मान दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच गेल्या वर्षी याची चर्चा सुरू झाली होती. एका आयटम साँगमध्ये मेहविशला पाहून दाऊदला भुरळ पडली होती आणि यानंतर त्याने मेहविशला अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे बोलले जातं आहे.


हे ही वाचा – नाना पटोलेंनी घेतली फडणवीसांची भेट; विधान परिषदेची पोटनिवडणूक होणार बिनविरोध?