‘Taarak Mehta…..’ मध्ये दयाबेनची एन्ट्री तर बबिता घेणार एक्झीट

हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून भारतासह जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील मुख्य पात्र जेठालाल आणि दयाच्या जोडीला हिंदी टेलिव्हिजन वरील प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. मालिकेतील दयाच्या पात्राला अभिनेत्री दिशा वकानीने पुरेपुर न्याय दिला आहे. मालिकेतील दयाच्या स्वभावातील खरेपणा, गोडवा आणि खट्याळ अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दया हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी मालिकेत दिसून आली नाही. अनेक दिवसांपासून प्रेक्षक दयाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे.

मालिकेत पुन्हा दिसणार दया….?
सूत्रांच्या मते मागील काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते अभिनेत्री दिशा वकानीला मालिकेत परत आणण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहेत. दरम्यान या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दयाची भूमिका साकरण्यासाठी दिशा वाकानी किंवा दुसऱ्या नव्या अभिनेत्रीची निवड करण्याची घोषणा केली आहे. माध्यामांशी बोलताना असित कुमार मोदी म्हणाले की, “दयाची भूमिका साकारण्यासाठी दिशा वाकानी पुन्हा परतणार आहे की नाही हे मी नाही सांगू शकत. आमचे दिशा वाकानी सोबत आजही चांगले संबंध आहेत. मात्र आता त्यांचे लग्न झालं आहे आणि त्यांना बाळ सुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपली जबाबदारी निभावण्यासाठी व्यस्त आहे.”

मुनमुन दत्ता सोडणार मालिका

काही दिवसांपूर्वी या मालिकेतील तारक मेहताची मुख्य भूमिका साकरणारा अभिनेता शैलेश लोढाने मालिका सोडली. सूत्रांच्या मते आता बबीता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सुद्धा मालिका सोडू शकते. मुनमुन दत्ताला बिग बॉस ओटीटीसाठी अप्रोच करण्यात आलं आहे.

 


हेही वाचा :जस्टिन बिबर करणार भारतात परफॉर्मन्स; ‘या’ दिवशी होणार कॉन्सर्ट