घरमनोरंजनइमोशनल, कॉमेडी, भन्नाट डायलॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा 'दे धक्का...

इमोशनल, कॉमेडी, भन्नाट डायलॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा ‘दे धक्का 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

इमोशनल,कॉमेडी,भन्नाट डालॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा 'दे धक्का 2' सिनेमाचा 5 ऑगस्ट 2022 ला प्रेषकांच्या भेटीस येत आहे

महाराष्ट्राला मनोरंजनाचा ओव्हर डोस देणाऱ्या ‘दे धक्का’ चित्रपटाचा पार्ट 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामुळेच आता पुन्हा एकदा मनोरंजनाची गाडी सुसाट धावू लागणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या संदर्भात महत्वपूर्ण घोषणा त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केली आहे. इमोशनल,कॉमेडी,भन्नाट डालॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा ‘दे धक्का 2’ सिनेमाचा 5 ऑगस्ट 2022 ला प्रेषकांच्या भेटीस येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

- Advertisement -

‘दे धक्का’ चित्रपटाच्याघवघवीत यशानंतर आता सिनेमाचा दुसरा पार्ट अर्धात धमाल कॉमेडीचा दुसरा डोस ‘दे धक्का 2’ मधून पाहायला मिळणार आहे. खरंतर हा सिनेमा जानेवारीममध्ये रिलीज होणार होता.मात्र कोरोनामुळे याची तारीख काहीशी पुढे ढकलण्यात आली. मात्र 5 ऑगस्टरोजी हा सिनेमा मनरोंजन करण्यास सज्ज झाला असल्याचं मांजरेकरांनी सांगितलेलं आहे.

दरम्यान या चित्रपटात नक्की कोण कोणते कलाकार असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागील आहे.मात्र माहितीनुसार सिनेमात सर्व कलाकार हे नव्या रुपात वेगळ्या स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण यावेळ दौरा कोल्हापूर ते मुंबई नाही तर कोल्हापूरकरांची लंडनावरी असणार आहे. आता कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील हे तरबेज कलाकार नेमंक लंडनमध्ये जाऊन काय धम्माल करतील हे पाहण रंजक ठरणार आहे.

- Advertisement -

‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय 1..2..3..4 – “दे धक्का 2” येतोय 5 ऑगस्ट 2022 ला … असं म्हणत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मोठ्या उत्साहात सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे.

तसेच आता या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर ( Medha Manjrekar) गौरी इंगवळे (Gauri Ingwale), सक्षम कुलकर्णी ( Saksham Kulkarni) आणि सिद्धार्थ जाधव ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 2008 साली प्रदर्शित झालेला दे धक्का हा सिनेमा litle miss sunshine या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक होता. यासह मराठीच नाही तर क्रेझी फॅमिली नावानं कन्नडमध्ये देखील दाखवण्यता आला. आता येणाऱ्या ‘दे धक्का 2’ मध्ये लंडनमध्ये घडणारी कथा दाखवण्यात येणार आहे. सिनेमाचं संपूर्ण शुटींगही लंडनमध्येच करण्यात आलं आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -