घरमनोरंजनसुसाईड नोट लिहून अभिनेत्री कुलजीत रंधावाने 'या' साठी केली होती आत्महत्या

सुसाईड नोट लिहून अभिनेत्री कुलजीत रंधावाने ‘या’ साठी केली होती आत्महत्या

Subscribe

मालिकेच्या छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे कुलजीत रंधावा. कुलजीतने फार कमी कालावधीतच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एक जबरदस्त अभिनेत्रीने मात्र करियरच्या एका टप्प्यावर तिचे आयुष्य संपवले. कुलजीतने आत्महत्या करुन या जगाचा निरोप घेतला. तिची आत्महत्या हा तिच्या चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता. आज अभिनेत्री कुलजीत जरी आपल्यात नसली तरी तिचा दमदार अभिनय आणि तिने स्वत: ची तयार केलेली ओळख आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. कुलजीतने आत्महत्या केली तेव्हा तिचे वय केवळ ३० वर्षे होते. तिची अकाली एक्झिट सर्वांना चटका लावणारी होती. ८ फेब्रुवारी २००६ रोजी कुलजीतने गळफास घेऊन तिचे आयुष्य संपवले होते.

कुमकुम, कुसूम, कम्बख्त इश्क, हिप हिप हुर्रे यासांरख्या मालिकांमधून कुलजीतचे काम केले होते. एकता कपूरच्या अनेक गाजलेल्या मालिकांमधून कुलजीतने काम केले होते. छोट्या पडद्यावर कुलजीतने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. कुलजीतची आत्महत्या हा सर्व सिनेसृष्टीला बसलेला मोठा धक्का होता. मुंबईतील तिच्या राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या घरात तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला पहायला मिळाला. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइट नोटही लिहून ठेवली होती. त्या सुसाइट नोटवरुनही अनेक चर्चा रंगल्या होत्या. अभिनेत्री कुलजीतने प्रेमभंगामुळे तिचे आयुष्य संपवले अशा चर्चा सुरु होत्या.

- Advertisement -

माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार ठरवू नये. मी माझ्या आयुष्याला कंटाळून दबाव सहन करु शकले नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे,अशी सुसाइट नोट कुलजीतने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली होती. तिचा सहकलाकार भानू उदय याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघांमध्ये काही वाद विवाद झाले. हा प्रकार कुलजीत सहन करु शकली नाही म्हणून तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते.


हेही वाचाHappy Birthday Jagjit singh : १५० हून अधिक अल्बम करणारे गझल सम्राट,पहा त्यांच्या प्रसिद्ध गझल

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -