दोन वेळा कॅन्सरला मात दिलेल्या अभिनेत्री एंड्रिला शर्माचा मृत्यू

बंगाली चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्माचं नुकतंच निधन झालं असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एंड्रिलाने वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना धक्का बसला आहे. एंड्रिलाला 1 नोव्हेंबर रोजी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यावेळी तिला कोलकाता येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासादरम्यान 14 नोव्हेंबर रोजी एंड्रिलाला मल्टीपल कार्डियक अरेस्ट आले, ज्यामुळे ती कोमामध्ये गेली होती. मागील अनेक दिवसांपासून एंड्रिला जीवन आणि मृत्यूची झुंज देत होती. तिचे चाहते तिची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत होते. मात्र, एंड्रिलाच्या मृत्यूनंतर चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.

व्हेंटिलेटरवर होती एंड्रिला शर्मा

 

View this post on Instagram

 

A post shared by Aindrila Sharma (@aindrila.sharma)

14 नोव्हेंबर रोजी एंड्रिलाला मल्टीपल कार्डियक अरेस्ट झाले होते. ज्यानंतर तिची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. एंड्रिलाला वाचवण्यासाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र, उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला.

दोन वेळा कॅन्सरला दिली होती मात
24 वर्षाच्या एंड्रिला शर्माला दोन वेळा कॅन्सर देखील झाला होता. तिने दोन वेळा कॅन्सरवर मात केली होती. मात्र, त्यानंतर देखील तिला अटॅकमुळे आपला जीव गमवावा लागला. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.59 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.

 


 

2023 मध्ये आथिया शेट्टी आणि केएल राहुल करणार लग्न? सोशल मीडियावर चर्चांना उधाण