घरताज्या घडामोडीमहाभारतातील 'भीम' यांचे निधन ; उतारवयात करावा लागला आर्थिक अडचणींचा सामना

महाभारतातील ‘भीम’ यांचे निधन ; उतारवयात करावा लागला आर्थिक अडचणींचा सामना

Subscribe

बीआर चोप्रा यांची प्रसिद्ध मालिका महाभारतात भीमाची भूमिका साकारणाऱ्या महान अभिनेता प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. प्रवीण यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला . प्रवीण कुमार यांच्या निधनाने सोशल मिडियातून शोक व्यक्त केला जात आहे.

बीआर चोप्रा यांची प्रसिद्ध मालिका महाभारतात भीमाची भूमिका साकारणाऱ्या महान अभिनेता प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. प्रवीण यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला . प्रवीण कुमार यांच्या निधनाने सोशल मिडियातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रवीण कुमार यांचे निधन दिल्लीमध्ये झाले आहे.

प्रवीण कुमार यांनी ‘या’ चित्रपटातही केले होते काम

प्रवीण कुमार यांनी महाभारत या मालिकेशिवाय बॉलीवूडच्या काही चित्रपटांमधूनही दमदार अभिनय करुन प्रेक्षकांचे मनं जिंकून घेतले होते. मात्र ते भीमाच्या भूमिकेमुळे प्रकाशाच्या झोतात आले. प्रवीण कुमार यांची निधनाची माहिती कळताच त्यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

ऑलिंपिक खेळातही घेतला होता सहभाग

प्रवीण कुमार यांना त्यांच्या शानदार शरीरयष्ठीसाठी ओळखले जाते. पंजाबचे राहणारे प्रवीण कुमार 6 फीट उंच होते. अभिनयात पदार्पण करण्याआधी ते खेळामध्ये फार सक्रिय होते. प्रवीण यांनी आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अनेक मेडल्स जिंकले आहेत. हॉंगकॉंगच्या अनेक आशियाई खेळामध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकले आहे. त्यांनी ऑलिंपिकमध्ये देशाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे.

प्रवीण कुमारचे अखरचे दिवस हालाखीचे गेले

महाभारतातील या भीमाचे शेवटचे दिवस हालाखीचे गेले. त्यांना उतारवयात कोणताच आर्थिक आधार नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार ते मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करत होते. प्रवीण यांनी 100 रुपयांच्या शगुनने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. महाभारतानंतर त्यांनी जवळपास 50 सिनेमा आणि टीव्ही शो केले. त्यानंतर त्यांनी अभिनय करणे सोडून दिले आणि वजीरपुरमध्ये आम आदमी पार्टी (AAP) ला जॉइन होऊन राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आप पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवीण कुमार यांनी आयुष्यात अनेक गोष्टी केल्या याशिवाय अनेक यश मिळाले मात्र वयाच्या शेवटच्या क्षणात त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

- Advertisement -

हे ही वाचा – अखेर अक्षय कुमार The Kapil Sharma Show मध्ये जाणार, नाराजीच्या एपिसोडवर अखेर पडदा


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -