Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांना पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल करण्यात आला आहे. ज्यात त्यांना तू लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊ नको नाहीतर तुलाही लवकरच मारले जाईल असं लिहिण्यात आले आहे. दरम्यान, सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांच्या तक्रारीवरून मानसा पोलिसांनी अज्ञात धमकी देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याआधीही राजस्थानमधून बलकौर सिंग यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आले होते, त्यांच्या तक्रारीनंतर आरोपीला जोधपूरमधून ताब्यात घेण्यात आले होते.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग आणि सलमान खान यांना 25 एप्रिल आधी मारले जाईल असा मेल आधीदेखील आला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी जोधपूरमधून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.

बलकौर सिंग यांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित केला

- Advertisement -

मानसाच्या दाना मंडीत सिद्धू मुसेवालाची पहिली जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावरून बोलताना सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीवर निशाणा साधत एक गुंड स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेत असल्याचे सांगितले. तुरुंगात बसून तो म्हणतो की मी सिद्धूला मारले आहे आणि सलमानला मारणार आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, सिद्धूच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, गँगस्टर गोल्डी ब्रार अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचला नाही. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले सरकार काहीच पुढाकार घेत नसल्याचं बलकौर सिंग यांनी सांगितलं.

 


- Advertisement -

हेही वाचा :

‘भोला’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

- Advertisment -