Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अतरंगी फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

अतरंगी फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

Subscribe

मुंबई : नेहमी वेगळ्या फॅशन सेन्स, बोल्ड आणि ग्लॅमरसाठी उर्फी जावेद ही ओळखली जाते. उर्फी जावेदच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. पण अनेकदा उर्फी जावेदला तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोलिंगाचा ही सामना करावा लागतो. सोशल मीडियावरून उर्फीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या संदर्भात उर्फी जावेदने स्वत: ट्विट करत यांची माहिती दिली आहे.

उर्फी जावेदने तिला आलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट ट्वीट पोस्ट केला आहे. उर्फीने ट्वीट केलेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये लिहिले की, “लवकरच तुला गोळ्या घालून मारू. तू भारतात जी काही घाण पसरवली आहेस ना, ती साफ करणार आहे.” उर्फीने तो स्क्रीनशॉट तिने तिच्या ट्वीटरवर हँडलवर शेअर केली आहे. या ट्वीटला उर्फीने कॅप्शन दिले की, “माझ्या आयुष्यातील नियमित दिवस”, असे दिले आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांपूर्वी उर्फीला तिच्या डार्क सर्कलमुळे ट्रोल केले होते. यानंतर उर्फीने डार्क सर्कलवर ट्रिटमेंट देखील घेतली होती. या ट्रिटमेंटमुळे तिच्या डोळ्यांखाली सूज आली होती. यानंतर उर्फी तिचा फोटो इन्सट्राग्रामवर स्टोरी शेअर केला होता. या फोटोत ती वेगळी दिसत होती.

- Advertisement -

हेही वाचा – नव्या अतरंगी लूकमुळे उर्फी पुन्हा ट्रोल

बिग बॉस ओटीटी 2 मध्ये पाहुणी म्हणून एंट्री

उर्फीने बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. नुकतेच उर्फीने बिग बॉस ओटीटी 2 मध्ये पाहुणी म्हणून एंट्री घेतली होती.

- Advertisment -