दीपक तिजोरीने केला सह-निर्मात्यावर 2.6 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरी यांनी 2.6 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यांनी सहनिर्माते मोहन नाडर यांच्यावर चित्रपटाच्या लोकेशनच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. दीपक तिजोरी यांनी 15 मार्च रोजी, मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात सहनिर्माते मोहन नाडर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

खरं तर, एका थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी दीपक तिजोरी आणि मोहन नाडर एकत्र आले होते. मात्र, चित्रपटाच्या लोकेशनच्या नावाखाली फसवणूक केल्यानंतर मोहन गोपाल नाडर यांच्यावर कलम 420 आणि 406 दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु करण्यात आला आहे.

दीपक तिजोरीने पोलिसांना सांगितलं की, नाडरने लंडनमध्ये चित्रपटाच्या लोकेशनसाठी पैसे मागितले होते. ते त्याने अजूनही परत केले नाही. अंबोली पोलिसांच्या मते, 2019 मध्ये ‘टिप्सी’ चित्रपटासाच्या लोकेशनच्या नावाखाली मोहन नाडरने दीपक तिजोरीकरुन 2.6 कोटी मागितले होते. ते जेव्हा त्याच्याकडे परत मागितले त्यावेळी त्याला काही चेक दिले, मात्र ते बाऊन्स झाले होते. शिवाय अजूनही त्याने पैसे परत केले नाहीत. सध्या या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.

दरम्यान, दीपक तिजोरीने ‘टिप्सी’ चित्रपटात दिग्दर्शन आणि अभिनय केला आहे. या चित्रपटात पाच अभिनेत्री असणार आहेत. दीपक तिजोरीने 90 च्या दशकात बऱ्याच सुपरहीट चित्रपटात काम केलं आहे. त्याने महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं.


हेही वाचा :

लवकरच रॅम्पवर परत येण्याची इच्छा… अपघातानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत