घरमनोरंजनया ठिकाणी रणवीर- दीपिकाचे होणार लग्न

या ठिकाणी रणवीर- दीपिकाचे होणार लग्न

Subscribe

रणवीर-दीपिकाचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. इटली येथे बुक केलेल्या विवाह स्थळाची काय विशेषतः आहे? या बद्दल जाणून घ्या.

बॉलिवूडमधील बहुचर्चित लग्न म्हणजेच रणवीर- दीपिकाचे लग्न येत्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. रणवीर-दीपिकाच्या लग्नाला घेऊन त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. मात्र रणवीर-दीपिकाने भारताबाहेर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या फॅन्समध्ये नाराजीचे स्वर उमटत आहे. रणवीर- दीपाकाचे लग्न कशा पद्धतीने होणार यावर जाणून घ्यायला लोकांना उत्सुकता आहे. रणवीर- दीपिकाचे लग्न इटलीतील एका व्हिलामध्ये होणार आहे. हा व्हिला खूप प्रशस्त आहे. आलेल्या पाहूण्यांना थांबण्यासाठी या व्हिलात अनेक खोल्या आहेत.

व्हिला DEL कुठे आहे?

हा प्रशस्त व्हिला इटली येथील लेन्नो शहरात आहे. कोमो या नदी काठी हा व्हिला आहे. या व्हिल्या जवळ संग्रहालय आहे. इटलीतील हे एक उत्कृष्ट विवाह स्थळ आहे. हॉलिवूड कलाकारांसाठी ही एक आवडती जागा आहे. अनेक हॉलिवूड कलाकारांचे लग्नही या व्हिल्यात झाले होते. सप्टेबर महिन्यात मुकेश आणि निता अंबानी आपल्या मुलीच्या लग्नासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन ही याठिकाणी करण्यात आले होते.

- Advertisement -

काय आहे विशेषतः 

तेराव्या शतकात बांधण्यात आलेला हा व्हिला एक प्राचीन शिल्पाचे उदाहरण आहे. या व्हिलामध्ये २०१५ मध्ये चक्क ९० हजार पर्यटक राहाण्यासाठी आले होते. नदी काठी असल्यामुळे येथे खूप शांतता आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट जेम्स बाँडचे चित्रीकरण याच व्हिलामध्ये झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -