दीपिका आणि रणवीर आता फक्त भारतातीलच नाही तर आशियातील पॉवर कपल्सपैकी एक

चीनमधील साउथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ मधीस आशिया खंडातील पॉवर कपल्सची यादी तयार केली, ज्यात दीपिका आणि रणवीरचे नाव चौथ्या क्रमांकावर आले आहे

बॉलिवूडचं सुपर कपल रणवीर आणि दीपिकाच्या जोडीचे करोडो चाहते आहेत. दोघेही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. वारंवार सोशल मीडियावर ते फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की हे सुपर कपल आता फक्त बॉलिवूडच्या पॉवर कपल पैकी मर्यादीत नसून आता संपूर्ण आशियातील पॉवर कपल पैकी एक झाले आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आशिया खंडातल्या पॉवर कपल्सच्या यादीमध्ये बॉलिवूडच्या जोडप्यांना सुद्धा स्थान देण्यात आले. तसेच ही यादी चीनमधील साउथ चायना मॉर्निंग पोस्टने २०२२ मधील आशिया खंडातील पॉवर कपल्सची यादी तयार केली, ज्यात दीपिका आणि रणवीरचे नाव चौथ्या क्रमांकावर आले आहे. तसेच आशियातील पॉवर कपल्समध्ये हाँगकाँगचा अभिनेता टोनी लेउंग आणि करीना ल्यू यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आले असून दक्षिण कोरियातील अभिनेता रेन आणि किम ताए हे दुसऱ्या क्रमांकावर, तर सिंगापूरचे फॅन वोंग आणि क्रिस्टोफर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय आपल्या भारतातील लोकप्रिय पॉवर कपल दीपिका आणि रणवीर चौथ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी दीपिका आणि रणवीर व्यतीरिक्त बॉलिवूडची कोणतीही जोडीने या यादीत स्थान मिळवले नव्हते.

बॉलिवूडमधील श्रीमंत कपल

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका आणि रणवीर यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. दीपिका आणि रणवीर जाहिराती आणि चित्रपटांमधून कोट्यावधी रूपये कमावतात. तसेच या दोघांची एकूण संपत्ती १ हजार २३७ कोटी रूपयांची असल्याचे म्हटले जाते.

या चित्रपटांमध्ये झळकणार दीपिका आणि रणवीर
सध्या दीपिका पादुकोण ‘पठाण’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे, तसेच रणवीर सिंह सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो ‘सर्कस’ या चित्रपटामध्ये देखील काम करणार आहे.

 


हेही वाचा  : प्रेग्नेंसीबाबतच्या उलट-सुलट चर्चांमुळे आलिया भट्टचा संताप; मी एक स्त्री, पार्सल नाही