घरमनोरंजनदीपिका-रणवीरने शाही लग्नसोहळ्याचा विमा उतरवला

दीपिका-रणवीरने शाही लग्नसोहळ्याचा विमा उतरवला

Subscribe

बॉलीवूडचे लव्हबर्ड असलेले दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग इटलीत लग्नगाठ बांधणार असून त्यांनी या सोहळ्याचा विमा उतरवला आहे.

बी टाऊनमध्ये काही तासांमध्ये आणखी एक शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. बॉलीवूडचे लव्हबर्ड असलेले दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग उद्या, १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या इटलीतील लेक कोमो येथील हॉटेल व्हिला देल बालिवियानेलो मध्ये त्यांच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. पाहुण्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सामान्य लोकांच्या एन्ट्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे दीपिका आणि रणवीर यांनी लग्नसोहळ्याचा विमाही उतरवला आहे.

वाचा : दीपिका –रणवीरचं ग्रँड रिसेप्शन २८ नोव्हेंबरला

- Advertisement -

लग्नासह रिसेप्शनचाही विमा 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर यांनी एका विमा कंपनीकडून ‘ऑल रिस्क पॉलिसी’ ही विमा पॉलिसी विकत घेतली आहे. यात १२ ते १६ नोव्हेंबरपर्यंत होणारे सर्व कार्यक्रम आणि विधींना विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. विमानप्रवास, भूकंप, चोरी, पूर,वादळ, आग यामुळं लग्नात अडथळा आल्यास या विम्याचं संरक्षण मिळणार आहे. तसंच या लग्नसोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या दागिण्यांचा विमा देखील काढण्यात आला आहे.

deepika - ranveer
दीपिका-रणवीर लग्नाची पत्रिका (सौजन्य-टाइम्स ग्रुप)

वाचा : या ठिकाणी रणवीर- दीपिकाचे होणार लग्न

- Advertisement -

पाहुण्यांना ई-इनव्हाइट दिले 

शिवाय भारतात होणाऱ्या रिसेप्शनसाठी देखील दीपिका आणि रणवीर यांनी सुरक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शन समारंभाला बॉलिवूड तसंच इतर क्षेत्रातील मोठे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी कमालीची खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व पाहुण्यांना ‘ई-इनव्हाइट’ म्हणजेच इ-पत्रिका पाठवण्यात आली असून रिसेप्शनला येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये ‘ई-इनव्हाइट’ सेव्ह करावं लागणार आहे. यात असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतरच पाहुण्यांना विवाहस्थळावर प्रवेश मिळणार आहे.

वाचा : दीपिका-रणवीर wedding : पहिला फोटो व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -