Photos – रणवीरसाठी दीपिका बनली शेफ, नेटकरी म्हणाले…

सध्या लॉकडाऊनमुळे बॉलिवूडचे सेलेब्रेटी घरकामात रमले आहेत. आपण सध्या घरी बसून काय करतो याचे अपडेटही ते वेळोवेळी चाहत्यांना द्यायला अजिबात विसरत नाहीत. कोणी घरात साफसफाई करतय तर कोणी किचनमध्ये रमलय. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील घरातली कामं करताना दिसत आहे.

दीपिका आपल्या लाडक्या नवऱ्याला खूष करण्यासाठी रोज नव नवीन पदार्थ बनवताना दिसतेय. रणवीर दीपिकानं बनलेले पदार्थ चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. सध्या रणवीरने शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या स्टोरीमध्ये दीपिकाने रणवीरसाठी बनवलेले वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. यात थाय सलाड, थाय ग्रीन करी, राइस, व्हेजीटेबल सूप इतके पदार्थ बनवले होते.

इतकच नाही तर डेझर्टमध्ये दीपिकाने रणवीरसाठी केक देखील बनवला होता. रणवीर हे फोटो शेअर करत दीपिकाचं तोंडभरून कौतूक केलं आहे. सध्या हे फोटो नेटकऱ्यांसाठी नाही बॉलिवूडकरांसाठी देखील चर्चेचा विषय ठरले आहेत.