दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या वर्षी सप्टेंबरमध्ये आईवडील बनले. त्यांच्या मुलीचे नाव दुआ असे आहे. आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर दीपिका प्रसिद्धीपासून दूर गेली आहे आणि पूर्णवेळ आईची कर्तव्ये पार पाडत आहे. पण तिच्या मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी, दीपिका नुकतीच दिलजीत दोसांझच्या बंगळुरू कॉन्सर्टमध्ये गेली आहे, जिथे तिने डान्स केला आणि मजा केली. कॉन्सर्टमधील दीपिकाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दीपिका पदुकोणने तिच्या मुलीच्या जन्मापासून कामातून ब्रेक घेतला आहे. या ब्रेकदरम्यान तिने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच स्वत:साठी वेळ काढला आहे. दीपिका शुक्रवारी बेंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान दिलजीतने दीपिकाच्या ब्रँडची जाहिरात केली आणि तिचं यासाठी खूप कौतुकही केलं. इतकंच नाही तर दोघेही स्टेजवर एकत्र नाचताना दिसले. तिच्या बाळंतपणानंतरच्या या पहिल्याच पब्लिक अपीरियन्समुळे तिचे चाहते भलतेच खुश आहेत.
दिलजीतने लव्हर हे गाणे गायले असून दीपिका त्यावर परफॉर्म करताना दिसली. याशिवाय, कॉन्सर्टच्या आणखी एका व्हिडिओमध्ये, दीपिका करीना कपूर खान स्टारर ‘क्रू’ मधील ‘चोली के पीछे’ गाण्यावर नृत्य करताना दिसली. हे गाणं दिलजीतने प्रेक्षकांसाठी थोड्या नव्या ढंगात आणलं आहे.
स्टेजवर पोहोचल्यानंतर दीपिकाने पंजाबी असलेल्या गायकाला म्हणजेच दिलजीतला काही कन्नड ओळीही समजावून सांगितल्या.
दिलजीतने या क्षणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्याने त्यात लिहिले आहे की, “क्वीन दीपिका पदुकोण,दिल लुमिनाटी टूर इन बंगळुरू.” दीपिकानेही यावर ‘या आठवणींसाठी धन्यवाद’ अशी सुंदर प्रतिक्रिया दिली आहे.
मुलीच्या जन्मानंतर दीपिका पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. या कॉन्सर्टमध्ये दीपिकाने निळ्या डेनिम पॅन्ट आणि स्नीकर्ससह पांढरा स्वेटशर्ट परिधान केला होता आणि नेहमीप्रमाणेच ती खूपच सुंदर दिसत होती. आई झाल्यानंतर दीपिकाची झलक पाहून चाहते खूश झाले असून सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा : Sai Tamhankar : ‘अग्नी’मधील सई प्रेक्षकांना भावली
Edited By – Tanvi Gundaye