HomeमनोरंजनDeepika Padukone Pregnant :गुडन्यूज! दीपिका आणि रणवीर होणार आई-बाबा!

Deepika Padukone Pregnant :गुडन्यूज! दीपिका आणि रणवीर होणार आई-बाबा!

Subscribe

अभिनेत्री दीपिका पादुकोण व रणवीर सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. आदर्श जोडी म्हणून दोघांकडे बघितले जाते. दीपिका व रणवीर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. पण आता दोघांनी देखील रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दीपिकाने शेअर केली पोस्ट

आता दीपिकाने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. दीपिका व रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची गुडन्यूज दिली आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 अभिनंदनाचा वर्षाव

खरं तर गेल्या दोन -तीन वर्षांत दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा अनेकदा झाल्या. पण आता तिनं ही गोड बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांनी अभिनंदानाचा वर्षाव केला आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत देखील लाडक्या जोडीचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी दीपिका एका अवॉर्ड सोहळ्यासाठी परदेशात गेली होती. तेव्हापासूनच तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण तिनं यावर मौन बाळगलं होतं. त्यानंतर की एअरपोर्टवरही स्पॉट झाली होती. तिच्या सैल कपड्यांमुळं नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचं म्हटलं होतं. या गोड चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत.

दीपिका आणि रणवीरची लव्हस्टोरी

दीपिका आणि रणवीर यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर, १४ नोव्हेंबर २०१८ रोजी दीपिका आणि रणवीर यांनी लग्न केलं. याआधीही दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. बॉलिवूडची लोकप्रिय जोडी गुडन्यूज कधी देणार याची चाहत्यांना देखील उत्सुकता होती.

दीपिका आणि रणवीरचे आगामी चित्रपट

दरम्यान, एकीकडे दोघेही आपापल्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. दीपिका लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर, रणवीर सिंह ‘सिंघम 3’ आणि ‘डॉन 3’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.