घर मनोरंजन लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दीप-वीर देणार 'या' देवस्थळांना भेट

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दीप-वीर देणार ‘या’ देवस्थळांना भेट

Subscribe

देवदर्शन करत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय दीपिका-रणवीरने घेतला आहे.

बॉलीवूडचे प्रसिद्ध दाम्पत्य दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह उद्या आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. डेस्टिनेशन वेडिंग केलेल्या दीप-वीरने लग्नाचा वाढदिवस देवदर्शन करुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर हे विवाह बंधनात अडकले. उद्या त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. कोणत्याही पद्धतीचे पार्टीचे आयोजन न करता देवदर्शन करत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय दीपिका-रणवीरने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही जोडी तिरुपती बालाजी मंदिर आणि सुवर्ण मंदिराचे दर्शन घेणार आहेत.

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

 

असा आहे ‘डे’ प्लॅन

१४ नोव्हेंबर म्हणजेच उद्या ते तिरुपतीसाठी रवाना होतील. त्यांच्या या देवदर्शनाला त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सर्वप्रथम ही जोडी बालाजी मंदिर आणि पद्मावती मंदिराचे दर्शन घेतील. त्यानंतर ही जोडी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत अमृतसरमधील सुवर्ण मंदिराकडे रवाना होणार आहेत. तेथील दर्शन झाल्यानंतर त्याच दिवशी पुन्हा ते मुंबईला परतणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दीप-रणवीर लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार नाही?

- Advertisment -