‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्ये झळकणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी

या चित्रपटाचा पहिल्रा पार्ट प्रदर्शित होण्यापूर्वीच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची देखील चर्चा होऊ लागली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा आगामी ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, पहिल्या पार्ट प्रदर्शित होण्यापूर्वीच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची देखील चर्चा होऊ लागली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असणार आहेत.

रणबीर, आलिया, दीपिका आणि रणवीर पहिल्यांदा एका चित्रपटात!

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

मीडिया रिपोरर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या पार्टमध्ये णबीर, आलिया, दीपिका आणि रणवीर हे एकत्र दिसणार आहेत. परंतु यांच्या भूमिका नक्की कोणकोणत्या असतील याबाबत माहिती समोर आलेली नाही. तसेच आलिया आणि रणबीरला त्यांच्या पहिल्या पार्टमधील संबंधीत भूमिकेतच पाहिले जाईल. यासोबतच असं सांगण्यात येत आहे की, या चित्रपटाचे निर्माते अयान मुखर्जी ब्रह्मास्त्रचे अनेक पार्ट प्रदर्शित करणार आहे. ज्यांना आपापसामध्ये जोडलं जाईल आणि चित्रपटातील अभिनेते शेवटी पाहूण्या कलाकारांच्या भूमिकांमध्ये दिसून येतील.

‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ मध्ये दिसणार हे कलाकार
‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’मध्ये अमिताभ बच्चन, रणबीप कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन हे महत्वाच्या भूमिकेत दिसून येतील. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :‘विक्रम वेधा’मध्ये ऋतिक खलनायक तर सैफ अली खान नायक; चित्रपटाचा टीझर प्रदर्शित